Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 98

117 Mantra
12/98
Devata- वैद्या देवताः Rishi- वरुण ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
त्वां ग॑न्ध॒र्वाऽअ॑खनँ॒स्त्वामिन्द्र॒स्त्वां बृह॒स्पतिः॑। त्वामो॑षधे॒ सोमो॒ राजा॑ वि॒द्वान् यक्ष्मा॑दमुच्यत॥९८॥

त्वाम्। ग॒न्ध॒र्वाः। अ॒ख॒न॒न्। त्वाम्। इन्द्रः॑। त्वाम्। बृह॒स्पतिः॑। त्वाम्। ओ॒ष॒धे॒। सोमः॑। राजा॑। वि॒द्वान्। यक्ष्मा॑त्। अ॒मु॒च्य॒त॒ ॥९८ ॥

Mantra without Swara
त्वाङ्गन्धर्वाऽअखनँस्त्वामिन्द्रस्त्वाम्बृहस्पतिः । त्वामोषधे सोमो राजा विद्वान्यक्ष्मादमुच्यत ॥

त्वाम्। गन्धर्वाः। अखनन्। त्वाम्। इन्द्रः। त्वाम्। बृहस्पतिः। त्वाम्। ओषधे। सोमः। राजा। विद्वान्। यक्ष्मात्। अमुच्यत॥९८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्या औषधीने क्षयरोगी माणूस (यक्ष्यात्‌) क्षयरोगापासून (अमुच्यत) मुक्त होऊ शकतो, आणि इतरही ज्या ज्या उपयोगी औषधी आहेत, त्यांना (गन्धर्वा:) गात्रविद्येत प्रवीण असणाऱ्या मनुष्याने (अखनन्‌) (वन, क्षेत्र आदी स्थळांत शोधावे आणि त्या औषधी खणून व उपटून आणाव्यात. (त्वाम्‌) त्या उपयुक्त औषधींना (इन्द्र:) परमैश्‍वर्यशाली व्यक्तीने (त्वाम्‌) त्या औषधींना (बृहस्थति:) वेदज्ञ मनुष्याने आणि (त्वाम्‌) त्या औषधींना (सोम:) उत्तमगुणराव (विद्वान्‌) सर्वशास्त्रज्ञाता (राजा) राजाने (त्वाम्‌) त्या त्या ठिकाणी शोधून खणून (एकत्रित करून) आणावे. (वनौषधी आणणारा मनुष्य कुशल व गुणग्राहक असावा. राजा, श्रीमंत माणसे यांनी औषधी-संग्रह कार्यावर नियंत्रण ठेवावे) ॥98॥
Essence
भावार्थ - (वृक्ष, वनस्पती, लता आदीचा कोणता तरी विशिष्ट भाग औषधि म्हणून उपयोगी असतो) कधी औषधी वृक्ष, लता, वनस्पतीच्या मुळात असते, कधी शाखा, पुष्प, पळ या अवयवांपासून प्राप्त होते. एखादा वृक्ष-वनस्पतीचे सर्व अवयव रोगनाशक असतात. मनुष्यांनी त्या औषधींचे यथोचित सेवन केले पाहिजे. ॥98॥
Subject
कोणी कोणी औषधीचे सेवन करावे (योग्य औषधी शोधून मिळविणारा कोण व कसा असावा,) याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -