Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 96

117 Mantra
12/96
Devata- वैद्या देवताः Rishi- वरुण ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ओष॑धयः॒ सम॑वदन्त॒ सोमे॑न स॒ह राज्ञा॑। यस्मै॑ कृ॒णोति॑ ब्राह्म॒णस्तꣳ रा॑जन् पारयामसि॥९६॥

ओष॑धयः। सम्। अ॒व॒द॒न्त॒। सोमे॑न। स॒ह। राज्ञा॑। यस्मै॑। कृ॒णोति॑। ब्रा॒ह्म॒णः। तम्। रा॒ज॒न्। पा॒र॒या॒म॒सि॒ ॥१६ ॥

Mantra without Swara
ओषधयः समवदन्त सोमेन सह राज्ञा । यस्मै कृणोति ब्राह्मणस्तँ राजन्पारयामसि ॥

ओषधयः। सम्। अवदन्त। सोमेन। सह। राज्ञा। यस्मै। कृणोति। ब्राह्मणः। तम्। राजन्। पारयामसि॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (सोमेन) (राज्ञा) सोमलता की जी औषधींचा राजा आहे, सोमलता की जी औषधींचा राजा आहे, त्या औषधी (सह) सोबत वा व्यतिरिक्त ज्या अन्य (ओषधय:) औषधी आहेत, त्यांचे ज्ञान-विज्ञान (गुणधर्म) विषयी तुम्ही सर्वजण (समवदन्त) आपसात चर्चा वा परिसंवाद करीत जा. हे वैद्य (राजन्‌) हे राजपुरुष, (ब्राह्मण:) वेद आणि युर्वेद आदी उपवेद यांचा ज्ञाता (उपवेद-आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद आणि स्थापत्यवेद) जो विद्वान मनुष्य आहे, तो (यस्मै) ज्या रोग्यासाठी या औषधींचा प्रयोग (कृणोति) करतो, (तम्‌) त्या रोग्याला (आम्ही राजपुरुष) त्या औषधी देऊन (पारयामसि) रोगरुप सागराच्या पैलतीरी नेही (रोग्याला औषध देणे, त्याची सेवा-परिचर्या करून त्यास रोगमुक्तीसाठी राजाधिकारी वा राजसेवक मदत करतात ॥96॥
Essence
भावार्थ - वैद्य जनांसाठी आवश्‍यक आहे की त्यांनी आपसात प्रश्‍नोत्तर (संवाद, चर्चा, परिसंवाद आदींच्या) रुपाने औषधींच्या गुणधर्माविषयी निरंतर अधिकाधिक शोध करावा आणि रोग्यांना, रोगमुक्त करून सुखी करावे. तसेच वैद्यांमधे जो उत्तम विद्वान अनुभवी वैद्य असेल, त्याने सर्वांना वैद्यक शास्त्र शिकवावे. ॥96॥
Subject
कोणत्या उपायाद्वारे व यत्नाद्वारे औषधिविज्ञान वाढेल, पुढील मंत्रात याविषयी प्रतिपादन केले आहे -