Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 95

117 Mantra
12/95
Devata- वैद्या देवताः Rishi- वरुण ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
मा वो॑ रिषत् खनि॒ता यस्मै॑ चा॒हं खना॑मि वः। द्वि॒पाच्चतु॑ष्पाद॒स्मा॒कꣳ सर्व॑मस्त्वनातु॒रम्॥९५॥

मा। वः॒। रि॒ष॒त्। ख॒नि॒ता। यस्मै॑। च॒। अ॒हम्। खना॑मि। वः॒। द्वि॒पादिति॑ द्वि॒ऽपात्। चतु॑ष्पात्। चतुः॑पा॒दिति॒ चतुः॑ऽपात्। अ॒स्माक॑म्। सर्व॑म्। अ॒स्तु॒। अ॒ना॒तु॒रम् ॥९५ ॥

Mantra without Swara
मा वो रिषत्खनिता यस्मै चाहङ्खनामि वः । द्विपाच्चतुष्पादस्माकँ सर्वमस्त्वनातुरम् ॥

मा। वः। रिषत्। खनिता। यस्मै। च। अहम्। खनामि। वः। द्विपादिति द्विऽपात्। चतुष्पात्। चतुःपादिति चतुःऽपात्। अस्माकम्। सर्वम्। अस्तु। अनातुरम्॥९५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (वैद्यराज म्हणतात) हे मनुष्यांनो, (अहम्‌) मी एक वैद्य) (यस्मै) ज्या प्रयोजनासाठी (झुपुड, रोप वा गवतसारख्या वनस्पती) औषधी (खनामि:) उपटतो वा खोदून काढतो, (खनिता) खोदून काढलेली ती औषधी (व:) तुम्हाला (मा) (रिषत्‌) कोणत्या प्रकारे हानिकारक होऊ नये. तसेच द्यो औषधी (व:) तुमच्या (अस्माकम्‌) आमच्यासाठी आणि (द्विपात्‌) दोन पायांचे प्राणी मनुष्य आदीसाठी तसेच (चतुष्यात्‌) गौ आयी प्राण्यासाठी (सर्व) एवढेच नव्हे तर सर्वांसाठी (अनातुरम्‌) रोग निवारक व्हाव्यात, (अशी आमची शुभकामना आहे) ॥95॥
Essence
भावार्थ - जो कोणी चतुर कुशल माणूस औषधींचे रोप, झुडप आदी खोदेल (अथवा उपटावों, पानें तोड आदी रुपाने त्या औषधी प्राप्त करील, त्याने काळजी घ्यावी की) त्या रोप आदींच्या मुळांची हानी होऊ नये. औषधी वृक्ष, लता, रोप आदीपासून जेवढे घेणे आवश्‍यक असेल, तेवढेच घेऊन रोगनिवारणासाठी वापरावे. तसेच त्याचे त्या औषधींच्या पुढील वृद्धी व विकासासाठी यत्न करावे व की ज्यामुळे सर्व प्राणी रोगरूप दु:खापासून दूर राहून सुखी होऊन राहतील ॥95॥
Subject
कोणीही औषधी नष्ट वा विकृत करूं नये, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -