Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 94

117 Mantra
12/94
Devata- भिषजो देवताः Rishi- वरुण ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
याश्चे॒दमु॑पशृ॒ण्वन्ति॒ याश्च॑ दू॒रं परा॑गताः। सर्वाः॑ सं॒गत्य॑ वीरुधो॒ऽस्यै संद॑त्त वी॒र्य्यम्॥९४॥

याः। च॒। इ॒दम्। उ॒प॒शृ॒ण्वन्तीत्यु॑पऽशृ॒ण्वन्ति॑। याः। च॒। दू॒रम्। परा॑गता॒ इति॒ परा॑ऽगताः। सर्वाः॑। सं॒गत्येति॑ सम्ऽगत्य॑। वी॒रु॒धः॒। अ॒स्यै। सम्। द॒त्त॒। वी॒र्य्य᳖म् ॥९४ ॥

Mantra without Swara
याश्चेदमुपशृण्वन्ति याश्च दूरम्परागताः । सर्वाः सङ्गत्य वीरुधो स्यै सन्दत्त वीर्यम् ॥

याः। च। इदम्। उपशृण्वन्तीत्युपऽशृण्वन्ति। याः। च। दूरम्। परागता इति पराऽगताः। सर्वाः। संगत्येति सम्ऽगत्य। वीरुधः। अस्यै। सम्। दत्त। वीर्य्यम्॥९४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वद्गण (निष्णात वैद्यजन) (या:) ज्या औषधी तुम्हाला (च) माहीत आहेत आणि ज्या औषधीविषयी (उषशृग्वन्ति) लोक खूप गुणकारी औषधी म्हणून ऐकतात, तसेच ज्या (या:) ज्या औषधी (च) जवळ आहे (वा जवळच्या प्रदेशात उपलब्ध आहेत) आणि ज्या (दूरम्‌) दूरच्याक्षेत्रात (परामता:) प्राप्त होतात, त्या (सर्वा:) सर्व (विरूध:) वृक्षादीच्यां औषधी तुम्ही (संगत्य) आपल्याजवळ ठेवा (वा आणून घ्या) आणि त्याद्वारे ज्याप्रमाणे तुम्ही वैद्यजन (इदम्‌) ही (विर्य्यम्‌) शरीराची शक्ती प्राप्त करतात, तशाच प्रकारे त्या शक्तिदायक औषधी (अस्यै) या (अशक्त व दुर्बळ असलेल्या) मुलीला (संदत्त) चांगल्याप्रकारे द्या ॥94॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनो, ज्या औषधीविषयी तुम्ही ऐकता की त्या दूरच्या प्रदेशात आहेत किंवा जवळच्या क्षेत्रात आहेत आणि रोगनिवारक व शक्तिदायक आहेत, त्या औषधी प्राप्त करा आणि त्यांचा उपयोग करून रोगरहित व्हा ॥94॥
Subject
शुद्ध देशात (स्वच्छ प्रदेशात) उगवलेल्या औषधींचाच उपयोग करावा, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -