Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 92

117 Mantra
12/92
Devata- वैद्या देवताः Rishi- वरुण ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
याऽओष॑धीः॒ सोम॑राज्ञीर्ब॒ह्वीः श॒तवि॑चक्षणाः। तासा॑मसि॒ त्वमु॑त्त॒मारं॒ कामा॑य॒ शꣳ हृ॒दे॥९२॥

या। ओष॑धीः। सोम॑राज्ञी॒रिति॒ सोम॑ऽराज्ञीः। ब॒ह्वीः। श॒तवि॑चक्षणा॒ इति॑ श॒तऽवि॑ऽचक्षणाः। तासा॑म्। अ॒सि॒। त्वम्। उ॒त्त॒मेत्यु॑त्ऽत॒मा। अर॑म्। कामा॑य। शम्। हृदे ॥९२ ॥

Mantra without Swara
या ओषधीः सोमराज्ञीर्बह्वीः शतविचक्षणाः । तासामसि त्वमुत्तमारङ्कामाय शँ हृदे ॥

या। ओषधीः। सोमराज्ञीरिति सोमऽराज्ञीः। बह्वीः। शतविचक्षणा इति शतऽविऽचक्षणाः। तासाम्। असि। त्वम्। उत्तमेत्युत्ऽतमा। अरम्। कामाय। शम्। हृदे॥९२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे स्त्री (वैद्यकशास्त्राची ज्ञाता विदुषी), (या:) ज्या (शतविचक्षणा:) अगणित शुभगुणांनी युक्त आणि (सोमराज्ञी:) सोम ज्यांचा राजा आहे, अशा सर्वोत्तम (बह्वी:) अनेक (ओषधी:) औषधी आहेत, (तासाम्‌) त्यांच्याविषयी (त्वम्‌) तू (उत्तमा) उत्तम विदुषी (असि) आहेस. यामुळे (शम्‌) तू कल्याणकारिणी असून (हृदे) आमच्या हृदयाला (अरम्‌) शक्ती व धैर्य देणारी आहेस आणि (कामाय) आमच्या इच्छापूर्तीसाठी योग्य आहेत (अथवा ज्या औषधी कल्याणकारी असून हृदयाला बळ देणाऱ्या आणि आमची इच्छा पूर्ण करणाऱ्या आहेत) तू आम्हाला (सर्वसामान्यांना व रोगी स्त्रियांना) त्या औषधींविषयी उपदेश कर ॥92॥
Essence
भावार्थ - स्त्रियांनी औषधि विद्या अवश्‍य शिकावी कारण की त्याविना कामनापूर्ती, सुखप्राप्ती आणि रोगनिवृत्ती कदापी होणे शक्य नाही. ॥92॥
Subject
स्त्रियांनी औषधिविद्या अवश्‍य शिकावी, पुढील मंत्रात याविषयी प्रतिपादन केले आहे -