Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 91

117 Mantra
12/91
Devata- वैद्या देवताः Rishi- वरुण ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒व॒पत॑न्तीरवदन् दि॒वऽओष॑धय॒स्परि॑। यं जी॒वम॒श्नवा॑महै॒ न स रि॑ष्याति॒ पूरु॑षः॥९१॥

अ॒व॒पत॑न्ती॒रित्य॑व॒ऽपत॑न्तीः। अ॒व॒द॒न्। दि॒वः। ओष॑धयः। परि॑। यम्। जी॒वम्। अ॒श्नवा॑महै। नः। सः। रि॒ष्या॒ति॒। पूरु॑षः। पूरु॑ष॒ इति॒ पुरु॑षः ॥९१ ॥

Mantra without Swara
अवपतन्तीरवदन्दिवऽओषधयस्परि । यञ्जीवमश्नवामहै न स रिष्याति पूरुषः ॥

अवपतन्तीरित्यवऽपतन्तीः। अवदन्। दिवः। ओषधयः। परि। यम्। जीवम्। अश्नवामहै। नः। सः। रिष्याति। पूरुषः। पूरुष इति पुरुषः॥९१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (दिव:) प्रकाशापासून (आकाशातून सूर्य आणि चंद्राच्या प्रकाशापासून (अवपतन्ती:) खाली येणाऱ्या (औषधय:) सोमलता आदी औषधी आहेत की ज्यांविषयी विद्वान (वैद्यजन) (पर्थ्यवदन्‌) नेहमी उपदेश करतात, त्या औषधींमधे (यम्‌) जी (जीवम्‌) प्राणशक्ती आहे, तिची आम्ही (अश्‍नवामहै) लाभ घ्यावा अशा (स:) त्या (पुरुष:) पुरुषाला (औषधी घेणारा माणसाला) कधीही (न)(रिष्याति) रोगामुळे मृत्यू येऊ नये. (आमच्या औषधी अचूक व नेहमी परिणामकारक असाव्यात) ॥91॥
Essence
भावार्थ - विद्वज्जनांनी (तज्ञ वैद्यांनी) दिव्य औषधीविद्येचे शिक्षण-ज्ञान सर्वाना द्यावे की ज्यामुळे सर्व जण पूर्ण आयुष्य जगतील. अशा गुणकारी औषधींना कोणी कदापी नष्ट करूं नये ॥91॥
Subject
अध्यापक (चिकित्साशास्त्राचे ज्ञाता) लोकांनी सर्वांना उत्तम औषधींविषयी माहिती सांगावी, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे -