Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 90

117 Mantra
12/90
Devata- वैद्या देवताः Rishi- भिषगृषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
मु॒ञ्चन्तु॑ मा शप॒थ्यादथो॑ वरु॒ण्यादु॒त। अथो॑ य॒मस्य॒ पड्वी॑शात् सर्व॑स्माद् देवकिल्वि॒षात्॥९०॥

मु॒ञ्चन्तु॑। मा॒। श॒प॒थ्या᳕त्। अथो॒ऽइत्यथो॑। व॒रु॒ण्या᳖त्। उ॒त। अथो॒ऽइत्यथो॑। य॒मस्य॑। पड्वी॑शात्। सर्व॑स्मात्। दे॒व॒कि॒ल्वि॒षादिति॑ देवऽकि॒ल्वि॒षात् ॥९० ॥

Mantra without Swara
मुञ्चन्तु मा शपथ्यादथो वरुण्यादुत । अथो यमस्य पड्वीशात्सर्वस्माद्देवकिल्बिषात् ॥

मुञ्चन्तु। मा। शपथ्यात्। अथोऽइत्यथो। वरुण्यात्। उत। अथोऽइत्यथो। यमस्य। पड्वीशात्। सर्वस्मात्। देवकिल्विषादिति देवऽकिल्विषात्॥९०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वज्जन, ज्याप्रमाणे महौषधी मनुष्यांना रोगापासून मुक्त करतात, त्याप्रमाणेच तुम्ही मला (अन्य दु:खकारक कृत्यापासून वा दुराचरणापासून दूर ठेवा) मला (शपथ्यात्‌) खोटी शपथ (वा साक्ष देण्यापासून) (अथो) आणि (वरूण्यात्‌) श्रेष्ठजनांप्रत अपराध करण्यापासून दूर ठेवा) (अथो) तसेच (यमस्य) न्यायाधीशापुढे (पड्वीशात्‌) न्यायविरूद्ध आचरण करण्यापासून (उत) आणि (सर्वस्मात्‌) (देवकिल्यात्‌) सर्व विद्वानांप्रत होणाऱ्या सर्व अपराधांपासून (मा) मला (मुञ्चन्तु) दूर ठेवा अथवा ठेवता, त्याप्रमाणे तुम्ही देखील तशा दुराचरण वा असत्यभाषणापासून दूर रहा ॥90॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांनी मादक पदार्थांचे सेवन कदापी करू नये. अन्य हितकर पदार्थांचे भोजन करावे. याशिवाय शपथ घेणे, श्रेष्ठजनांप्रत अपराध करणे, न्यायाविरोध करणे सोडून मूर्खांप्रमाणे ईर्ष्याद्वेषादीमध्ये फसूं नये. ॥90॥
Subject
कोणत्या औषधी कोणकोणत्या रोगापासून सोडवतात, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे -