Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 9

117 Mantra
12/9
Devata- अग्निर्देवता Rishi- वत्सप्रीर्ऋषिः Chhand- निचृदार्षी Swara- षड्जः
Mantra with Swara
पुन॑रू॒र्जा निव॑र्त्तस्व॒ पुन॑रग्नऽइ॒षायु॑षा। पुन॑र्नः पा॒ह्यꣳह॑सः॥९॥

पुनः॑। ऊ॒र्जा। नि। व॒र्त्त॒स्व॒। पुनः॑। अ॒ग्ने॒। इ॒षा। आयु॑षा। पुनः॑। नः॒। पा॒हि॒। अꣳह॑सः ॥९ ॥

Mantra without Swara
पुनरूर्जा निवर्तस्व पुनरग्नऽइषायुषा पुनर्नः पाह्यँहसः ॥

पुनः। ऊर्जा। नि। वर्त्तस्व। पुनः। अग्ने। इषा। आयुषा। पुनः। नः। पाहि। अꣳहसः॥९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजनांची विद्यानांप्रत प्रार्थना) हे (अग्ने) अग्नीप्रमाणे तेजस्वी अध्यापक विद्वानजनहो, आपण (न:) आम्हाला (प्रजाजनांना) (अंहस:) पापांपासून (पुन:) वारंवार (निवर्तस्व) वाचवा आणि आमच्यावर संकटे आल्यावर (पुन:) वारंवार वेळी (पाहि) आमची रक्षा करा. तसेच आम्हाला (इषा) दृढ इच्छा शक्ती द्या. (आयुषा) अन्न मिळविण्याचे आणि (ऊर्जा) पराक्रम युक्त कर्म करण्याचे सामर्थ्य द्या. ॥9॥
Essence
भावार्थ - विद्वज्जनांकरिता उचित आहे की त्यांनी उपदेश देण्यास योग्य अशा मनुष्यांना (जे उपदेश ऐकणारे व त्याप्रमाणे करणारे आहेत, त्या लोकांना) उपदेश करून पापकर्मापासून सदैव निवृत्त करावे व त्यांना शारीरिक व आत्मिक शक्ती द्यावी. तसेच त्यांनी (उपदेशक विद्वानांनी) स्वत:देखील पापकर्मापासून दूर असावे आणि परम पुरुषार्थी व्हावे. ॥9॥
Subject
पुढील मंत्रात अध्यापकाच्या कर्तव्याविषयी सांगितले आहे -