Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 89

117 Mantra
12/89
Devata- वैद्या देवताः Rishi- भिषगृषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
याः फ॒लिनी॒र्याऽअ॑फ॒लाऽअ॑पु॒ष्पा याश्च॑ पु॒ष्पिणीः॑। बृह॒स्पति॑प्रसूता॒स्ता नो॑ मुञ्च॒न्त्वꣳह॑सः॥८९॥

याः। फ॒लिनीः॑। याः। अ॒फ॒लाः अ॒पु॒ष्पाः। याः। च॒। पु॒ष्पिणीः॑। बृह॒स्पति॑प्रसूता॒ इति॒ बृह॒स्पति॑ऽप्रसूताः। ताः। नः॒। मु॒ञ्च॒न्तु। अꣳह॑सः ॥८९ ॥

Mantra without Swara
याः पलिनीर्याऽअपलाऽअपुष्पा याश्च पुष्पिणीः । बृहस्पतिप्रसूतास्ता नो मुञ्चन्त्वँहसः ॥

याः। फलिनीः। याः। अफलाः अपुष्पाः। याः। च। पुष्पिणीः। बृहस्पतिप्रसूता इति बृहस्पतिऽप्रसूताः। ताः। नः। मुञ्चन्तु। अꣳहसः॥८९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (या:) ज्या (फलिनी:) फलवती म्हणजे पुष्कळ फळें असलेली आणि (या:) ज्या (अफला:) फलरहित औषधीवृक्ष लता, आहेत, तसेच (या:) ज्या (अपुष्पा:) पुष्परहित (च) आणि ज्या (पुष्पिणी:) पुष्कळ फुलें असलेल्या औषधी वनस्पती लता आदी आहेत, त्या (बृहस्पतिप्रसूता:) वेदवाणीच्या स्वामी परमेश्‍वराने उत्पन्न केलेल्या त्या औषधींनी ज्याप्रमाणे (न:) आम्हाला (अंहस:) दु:खदायी रोगापासून (मुञ्चन्तु) सोडवावे, तद्वत (ता:) त्या औषधी तुमच्यासाठी देखील रोगनाशक असाव्यात. ॥89॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांसाठी उचित आहे की ईश्‍वराने सर्व प्राण्यांच्या प्रकृतिरक्षणासाठी आणि रोगनिवृत्तीसाठी ज्या औषधी उत्पन्न केल्या आहेत, त्या औषधींचा उपयोग वैद्यकशास्त्रात सांगितलेल्या रीतीप्रमाणे करावा आणि रोगनिवारण करून आणि पापकर्मापासून दूर राहून धर्मकार्यात मग्न रहावे. ॥89॥
Subject
परमेश्‍वराने रोगनिवृत्तीच्या उद्देशानेच औषधी उत्पन्न केल्या आहेत, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे-