Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 88

117 Mantra
12/88
Devata- वैद्या देवताः Rishi- भिषगृषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒न्या वो॑ऽअ॒न्याम॑वत्व॒न्यान्यस्या॒ऽउपा॑वत। ताः सर्वाः॑ संविदा॒नाऽइ॒दं मे॒ प्राव॑ता॒ वचः॑॥८८॥

अ॒न्या। वः॒। अ॒न्याम्। अ॒व॒तु॒। अ॒न्या। अ॒न्यस्याः॑। उप॑। अ॒व॒त॒। ताः। सर्वाः॑। सं॒वि॒दा॒ना इति॑ सम्ऽवि॒दा॒नाः। इ॒दम्। मे॒। प्र। अ॒व॒त॒। वचः॑ ॥८८ ॥

Mantra without Swara
अन्या वोऽअन्यामवत्वन्यान्यस्याऽउपावत । ताः सर्वाः सँविदाना इदम्मे प्रावता वचः ॥

अन्या। वः। अन्याम्। अवतु। अन्या। अन्यस्याः। उप। अवत। ताः। सर्वाः। संविदाना इति सम्ऽविदानाः। इदम्। मे। प्र। अवत। वचः॥८८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (वैद्य म्हणतात) हे स्त्रियांनो, तुम्ही (औषधी आणि रोगनिवारणाविषयी) आपसात चर्चा व संवाद करता. (मे) माझ्या (इदम्‌) या (वच:) गोष्टींचे (प्रावत) पालन करा (ता:) त्या ज्या (सर्वा:) सर्व औषधी (अन्या:) (एकमेकात मिसळल्यानंतर एक औषध (अन्यस्था:) दुसऱ्या औषधीचे गुणरक्षण व गुणवर्धन करते (उपावत) त्या ओषधींच्याजवळ जा (त्यांच्या प्रयोगाचे ज्ञान मिळवा) आणि ज्याप्रमाणे तुमच्यामधील (अन्या) एक स्त्री (अन्याम्‌) दुसऱ्या स्त्रीचे रक्षण करते, तद्वत (व:) तुम्हाला (वैद्यकशास्त्र अथवा आचारशास्त्र शिकवणारी स्त्री (पंडिता वा वैद्या) तुमचे रक्षण करो ॥88॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे एक आचारवान विदुषी स्त्री दुसऱ्या स्त्रीची रक्षा करते (दु:ख वा विषतीप्रसंगी तिला धीर देते व सांभाळते) त्या प्रमाणात योग्य पद्धतीने मिसळल्यानंतर औषधीदेखील एकमेकाच्या गुणांची वृद्धी करते. हे स्त्रियांनो, तुम्ही औषधीविज्ञानाची अधिकाधिक माहिती होण्यासाठी आपसात चर्चा-परिसंवाद करीत जा ॥88॥
Subject
योग्य पद्धतीने आणि उचित प्रमाणात मिश्रण केलेल्या औषधी रोगांचा नाश करतात, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -