Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 87

117 Mantra
12/87
Devata- वैद्यो देवता Rishi- भिषगृषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
सा॒कं य॑क्ष्म॒ प्रप॑त॒ चाषे॑ण किकिदी॒विना॑। सा॒कं वात॑स्य॒ ध्राज्या॑ सा॒कं न॑श्य नि॒हाक॑या॥८७॥

सा॒कम्। य॒क्ष्म॒। प्र। प॒त॒। चाषे॑ण। कि॒कि॒दी॒विना॑। सा॒कम्। वात॑स्य। ध्राज्या॑। सा॒कम्। न॒श्य॒। नि॒हाक॒येति॑ नि॒ऽहाक॑या ॥८७ ॥

Mantra without Swara
साकँयक्ष्म प्रपत चाषेण किकिदीविना । साकँवातस्य ध्राज्या साकन्नश्य निहाकया ॥

साकम्। यक्ष्म। प्र। पत। चाषेण। किकिदीविना। साकम्। वातस्य। ध्राज्या। साकम्। नश्य। निहाकयेति निऽहाकया॥८७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे तज्ञ वैद्यराज, (किकिदीविना) बौद्धिकक्षमता वाढविणाऱ्या (चोषण) आहारासह (साकम्‌) औषधीयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने (यक्ष्म) राजरोग (प्रपत) दूर होतो (असे आम्ही ऐकतो) (वातस्य) शरीरातील वायूच्या (ध्रज्या) गती (साकम्‌) सह (नश्‍य) (तो क्षय राजरोग) शीघ्र नष्ट होतो (वातरोग आणि क्षय) (निहाकया) शरीरास जी पीडा देतात, त्या पीडा आणि दु:खा (साकम्‌) सह ते रोग दूर व्हावेत, हे वैद्यराज आपण असे यत्न करा. ॥87॥
Essence
भावार्थ - मनुष्यांसाठी उचित व हितकर आहे की त्यांनी औषधी-सेवन, योगाभ्यास आणि व्यायामाच्या साहाय्याने रोग नष्ट करावेत आणि सुखी असावे. ॥87॥
Subject
कोणते रोग कशाप्रकारे नष्ट करावेत, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे -