Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 85

117 Mantra
12/85
Devata- वैद्यो देवता Rishi- भिषगृषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
यदि॒मा वा॒जय॑न्न॒हमोष॑धी॒र्हस्त॑ऽआद॒धे। आ॒त्मा यक्ष्म॑स्य नश्यति पु॒रा जी॑व॒गृभो॑ यथा॥८५॥

यत्। इ॒माः। वा॒जय॑न्। अ॒हम्। ओष॑धीः। हस्ते॑। आ॒द॒ध इत्या॑ऽद॒धे। आ॒त्मा। यक्ष्म॑स्य। न॒श्य॒ति॒। पु॒रा। जी॒व॒गृभ॒ इति॑ जीव॒ऽगृभः॑। य॒था॒ ॥८५ ॥

Mantra without Swara
यदिमा वाजयन्नहमोषधीर्हस्तऽआदधे । आत्मा यक्ष्मस्य नश्यति पुरा जीवगृभो यथा ॥

यत्। इमाः। वाजयन्। अहम्। ओषधीः। हस्ते। आदध इत्याऽदधे। आत्मा। यक्ष्मस्य। नश्यति। पुरा। जीवगृभ इति जीवऽगृभः। यथा॥८५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (एक अनुभवी वैद्याची उक्ती) हे मनुष्यांनो, (यथा) ज्याप्रमाणे (पुरा) पूर्वी (अहम्‌) मी (वाजयन्‌) प्रयत्नपूर्वक प्राप्त केलेल्या (यत्‌) ज्या (इमा:) या (ओषधी:) औषधींना (हस्ते) माझ्या हातात (आदधे) धारण केले आहे (या औषधी तुम्हांस दाखवीत आहे) या औषधीमुळे (जीवगृभ:) आयुष्याचा ताश करणाऱ्या व्याधीच आणि (यक्ष्मस्य) क्षय रोगासारख्या राजरोगाचे (आत्मा) मूलकारण (नश्‍यति) नष्ट होते. तुम्ही उत्तम युक्तीं (योग्यप्रमाणात) या औषधींचे उपयोग करा ॥85॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांनी उपयुक्त पद्धतीने औषधी शुद्ध कराव्यात, (शोधन, जारण, मारण, भट, भस्म आदी पद्धतीद्वारे तयार करून) औषधींचा उचित प्रमाणात उपयोग करावा. तसेच या महौषधीमुळे क्षय आदी भीषण रोगांना देखील नष्ट करून नित्य आंनदात वाहण्यासाठी प्रयत्नशील असावे. ॥85॥
Subject
पुढील मंत्रातही तोच विषय (औषधीसेवन) कथित आहे -