Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 83

117 Mantra
12/83
Devata- वैद्या देवताः Rishi- भिषगृषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
इष्कृ॑ति॒र्नाम॑ वो मा॒ताथो॑ यू॒यꣳ स्थ॒ निष्कृ॑तीः। सी॒राः प॑त॒त्रिणी॑ स्थन॒ यदा॒मय॑ति॒ निष्कृ॑थ॥८३॥

इष्कृ॑तिः। नाम॑। वः॒। मा॒ता। अथो॒ऽइत्यथो॑। यू॒यम्। स्थ॒। निष्कृ॑तीः। निष्कृ॑ती॒रिति॒ निःऽकृ॑तीः। सी॒राः। प॒त॒त्रिणीः॑। स्थ॒न॒। यत्। आ॒मय॑ति। निः। कृ॒थ॒ ॥८३ ॥

Mantra without Swara
इष्कृतिर्नाम वो माताथो यूयँ स्थ निष्कृतीः । सीराः पतत्रिणी स्थन यदामयति निष्कृथ ॥

इष्कृतिः। नाम। वः। माता। अथोऽइत्यथो। यूयम्। स्थ। निष्कृतीः। निष्कृतीरिति निःऽकृतीः। सीराः। पतत्रिणीः। स्थन। यत्। आमयति। निः। कृथ॥८३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (व:) तुमचे (इष्कृति:) कार्य सिद्ध करणारी जशी (माती) आता असते, मातेप्रमाणे तशा कार्य सिद्ध करणाऱ्या औषधी (नाम) प्रसिद्ध आहेत. (यूयम्‌) तुम्ही लोक त्या औषधींचे ज्ञान मिळविणारे आणि त्या औषधींचे सेवन करणारे (स्थ) व्हा. तसेच (पतत्रिणी:) वाहणाऱ्या (सीरा:) नद्यांप्रमाणे तुम्ही (निष्कृती:) उपकारांची परतफेड करणारे (स्थन) व्हा. (औषधी तुम्हाला लाभ देतात, तुम्ही त्या औषधींची वृद्धी, लागवड आदी करा) (अथो) यानंतर (लक्षात असू द्या की) (यत्‌) जी क्रिया, जी औषधयोजना अथवा जो वैद्य (आमयति) तुमचा रोग अधिक वाढवत असेल, त्याचा (निष्कृथ) त्याग करा ॥83॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे तुमचे माता-पिता तुमची सेवा (लालन-पालन) करतात, त्याप्रमाणे तुम्हीही त्यांची सेवा करीत जा. ज्या ज्या कामामुळे वा आचरणामुळे रोग होत असेल, ते काम सोडा. सेवन केल्यास औषधीदेखील आई प्रमाणे प्राण्यांना पोषण देते (रोगरहित करून बलवान बनविते) ॥83॥
Subject
योग्यप्रकारे घेतल्यास औषधी काय परिणाम करतात, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे-