Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 81

117 Mantra
12/81
Devata- वैद्यो देवता Rishi- भिषगृषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒श्वा॒व॒ती सो॑माव॒तीमू॒र्जय॑न्ती॒मुदो॑जसम्। आवि॑त्सि॒ सर्वा॒ऽओष॑धीर॒स्माऽअ॑रि॒ष्टता॑तये॥८१॥

अ॒श्वा॒व॒तीम्। अ॒श्वा॒व॒तीमित्य॑श्वऽव॒तीम्। सो॒मा॒व॒तीम्। सो॒म॒व॒तीमिति॑ सो॑मऽव॒तीम्। ऊ॒र्जय॑न्तीम्। उदो॑जस॒मित्युत्ऽओ॑जसम्। आ। अ॒वि॒त्सि॒। सर्वाः॑। ओष॑धीः। अ॒स्मै। अ॒रि॒ष्टता॑तय॒ इत्य॑रि॒ष्टऽता॑तये ॥८१ ॥

Mantra without Swara
अश्वावतीँ सोमावतीमूर्जयन्तीमुदोजसम् । आवित्सि सर्वा ओषधीरस्मा अरिष्टतातये ॥

अश्वावतीम्। अश्वावतीमित्यश्वऽवतीम्। सोमावतीम्। सोमवतीमिति सोमऽवतीम्। ऊर्जयन्तीम्। उदोजसमित्युत्ऽओजसम्। आ। अवित्सि। सर्वाः। ओषधीः। अस्मै। अरिष्टतातय इत्यरिष्टऽतातये॥८१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - औषधींचे गुणधर्म जाणून घेण्याची इच्छा असलेला एक मनुष्य म्हणतो) हे मनुष्यांनो (माझ्या मित्रांनो) मी (अरिष्टतातये) दु:खदायी रोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी (अश्‍वावतीम्‌) प्रशंसित गुणधर्म असलेल्या (सोमानतीम्‌) रसाने परिपूर्ण (उदोजसम्‌) शक्तिसामर्थ्य वाढविणाऱ्या आणि (ऊर्जयन्तीम्‌) शक्तिदायक उत्तम औषधीचे (आ) सर्वदृष्टीने परिपूर्ण ज्ञान (अवित्सि) प्राप्त करीत आहे, यासाठी की त्या (सर्वा:) सर्व (औषधी:) औषधी (अस्मै) या माझ्या देहासाठी सुखकारी व्हाव्यात. माझ्याप्रमाणे तुम्ही लोकदेखील त्या औषधींचे ज्ञान प्राप्त करा. (आणि उपयोग करून रोगनिवारण करा) ॥81॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांनी (वैद्याकडून) रोगांचे निदान करून घ्यावे आणि त्यांच्याकडून चिकित्सा, औषध योजना करून घेऊन पथ्य-पाणी विषयी नियमांचे पालन करून रोग दूर करावेत. तसेच औषधीच्या गुणांचा यथोचित लाभ घ्यावा. त्यामुळे रोगनिवृत्ती होऊन पुरुषार्थासाठी शक्ती संपादित करता येईल ॥81॥
Subject
माणसांनी नित्य नेहमी पुरुषार्थ करीत रहावे, याविषयी पुढील मंत्रात प्रतिपादन केले आहे -