Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 80

117 Mantra
12/80
Devata- ओषधयो देवताः Rishi- भिषगृषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
यत्रौष॑धीः स॒मग्म॑त॒ राजा॑नः॒ समि॑ताविव। विप्रः॒ सऽउ॑च्यते भि॒षग् र॑क्षो॒हामी॑व॒चात॑नः॥८०॥

यत्र॑। ओष॑धीः। स॒मग्म॒तेति॑ स॒म्ऽअग्मत्। राजा॑नः। समि॑तावि॒वेति॒ समि॑तौऽइव। विप्रः॑। सः। उ॒च्य॒ते॒। भि॒षक्। र॒क्षो॒हेति॑ रक्षः॒ऽहा। अ॒मी॒व॒चात॑न॒ इत्य॑मीव॒ऽचात॑नः ॥८० ॥

Mantra without Swara
यत्रौषधीः समग्मत राजानः समिताविव । विप्रः सऽउच्यते भिषग्रक्षोहामीवचातनः ॥

यत्र। ओषधीः। समग्मतेति सम्ऽअग्मत्। राजानः। समिताविवेति समितौऽइव। विप्रः। सः। उच्यते। भिषक्। रक्षोहेति रक्षःऽहा। अमीवचातन इत्यमीवऽचातनः॥८०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (यत्र) ज्या प्रदेशात (ओषधी:) सोमलता आदी औषधी उगवतात, तिथे जाऊन तुम्ही त्या औषधी (समग्मत) प्राप्त करा. ज्याप्रमाणे (राजान:) राजधर्माचे पालन करणारा वीर राजा (समिताविव) युद्धात शत्रूंवर चाल करून जातो (तद्वत तुम्ही औषधी मिळवा) आणि (रक्षोहा) दु:खदायी रोगांची नाश करणारा (अमीरचातन:) रोगांचे निवारण करणारा (विप्र) बुद्धिमान (भिषक) वैद्य जिथे असेल, (त्याच्याकडे जा) (स:) तो तुम्हांला (उच्यते) योग्य त्या औषधीचे गुण सांगेल औषध योजना करील. यामुळे (तुम्ही रोगी झाल्यास) औषधि प्राप्त करा आणि त्या अनुभवी वैद्याकडे जा. ॥80॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे सेनापतीद्वारा सैनिकी प्रशिक्षण प्राप्त करून राजाचे वीर सैनिक अत्यंत श्रम, पुरुषार्थ करीत देश देशांतरापर्यंत जाऊन शत्रूंना शोधून त्यांना जिंकतात, त्याप्रमाणे अनुभवी हुशार वैद्याकडून वैद्यकशास्त्राचे ज्ञान प्राप्त करून तुम्ही औषधी मिळवा. ज्या ज्या शुद्ध प्रदेशात औषधी आहेत, त्याची माहिती मिळवून तिथे जा आणि औषधींचा उपयोग करा. (स्वत:साठी आणि इतरांच्या रोगनिवारणासाठी त्या औषधी वापरा) तसेच तुम्हास माहीत झालेले ते औषधीविज्ञान इतरांनाही सांगा (गुप्त ठेऊं नका. त्याचा लाभ सर्वांना होऊ द्या) ॥80॥
Subject
(रोग झाल्यास) वारंवार वैद्याकडे जाऊन औषधोपचार घ्यावा, पुढील मंत्रात याविषयी प्रतिपादन केले आहे -