Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 78

117 Mantra
12/78
Devata- चिकित्सुर्देवता Rishi- भिषगृषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ओष॑धी॒रिति॑ मातर॒स्तद्वो॑ देवी॒रुप॑ ब्रुवे। स॒नेय॒मश्वं॒ गां वास॑ऽआ॒त्मानं॒ तव॑ पूरुष॥७८॥

ओष॑धीः। इति॑। मा॒त॒रः॒। तत्। वः॒। दे॒वीः॒। उप॑। ब्रु॒वे॒। स॒नेय॑म्। अश्व॑म्। गाम्। वासः॑। आ॒त्मान॑म्। तव॑। पू॒रु॒ष॒। पु॒रु॒षेति॑ पुरुष ॥७८ ॥

Mantra without Swara
ओषधीरिति मातरस्तद्वो देवीरुपब्रुवे । सनेयमश्वङ्गाँवासऽआत्मानन्तव पूरुष ॥

ओषधीः। इति। मातरः। तत्। वः। देवीः। उप। ब्रुवे। सनेयम्। अश्वम्। गाम्। वासः। आत्मानम्। तव। पूरुष। पुरुषेति पुरुष॥७८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पुत्राचे वचन माताप्रति) (ओषधी:) (इति) औषधीप्रमाणे सुखदायक (देवी:) उत्तम विदुषी हे माते, मी तुझा पत्र (व:) तुला (अथवा तुझ्यासमान सर्व मातांना) (तत्‌) ते श्रेष्ठ हितकारक कर्म करण्यासाठी (उपब्रुवे) तुझ्यासमीप राहून सदैव सांगत राहीन (वेळोवेळी उत्तम कर्म करण्याची प्रेरणा देत राहीन) (माता म्हणते) हे (पुरुष) माझ्या पुरुषार्थी श्रेष्ठ पुत्रा, मी तुझी माता (तव) तुला वा तुझ्यासाठी (अश्‍वम्‌) (सवारीसाठी) घोडा, (गाम्‌) (पुष्टिसाठी गौ आदी पशू तसेच शेतीसाठी) भूमी आणि (वास:) (नेसण्यासाठी) वस्त्र अथवा (राहण्यासाठी) घर यांची व्यवस्था करीत राहीन. याप्रमाणे तुझी सेवा करीत मी (आत्मानम्‌) स्वत:साठी ही त्या पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन करीन. ॥78॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे जव आदी औषधी सेवनाने शरीराला पुष्ट करतात, त्याप्रमाणे आईने चांगली विद्या, शिक्षण व उपदेश देऊन आपल्या संततीला पुष्ट (श्रेष्ठ) बनवावे. जी आईची संपत्ती ती संतानाची आणि जी संपत्ती संतानाची ती आईची, असे समजून माता-पुत्रांनी एकमेकाशी सदा प्रेमाने वागावे आणि आपल्या प्रेमपूर्ण वागणुकीने सर्वांना सुख द्यावे. ॥78॥
Subject
(माता) पिता आणि पुत्र, यांनी एकमेकाशी कसे वागावे, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादित आहे -