Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 75

117 Mantra
12/75
Devata- वैद्यो देवता Rishi- भिषगृषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
या ओष॑धीः॒ पूर्वा॑ जा॒ता दे॒वेभ्य॑स्त्रियु॒गं पु॒रा। मनै॒ नु ब॒भ्रूणा॑म॒हꣳ श॒तं धामा॑नि स॒प्त च॑॥७५॥

याः। ओष॑धीः। पूर्वाः॑। जा॒ताः। दे॒वेभ्यः॑। त्रि॒यु॒गमिति॑ त्रिऽयु॒गम्। पु॒रा। मनै॑। नु। ब॒भ्रूणा॑म्। अ॒हम्। श॒तम्। धामा॑नि। स॒प्त। च॒ ॥७५ ॥

Mantra without Swara
याऽओषधीः पूर्वा जाता देवेभ्यस्त्रियुगम्पुरा । मनै नु बभ्रूणामहँ शतन्धामानि सप्त च॥

याः। ओषधीः। पूर्वाः। जाताः। देवेभ्यः। त्रियुगमिति त्रिऽयुगम्। पुरा। मनै। नु। बभ्रूणाम्। अहम्। शतम्। धामानि। सप्त। च॥७५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (वैद्यराज म्हणत आहेत) (या:) ज्या (औषधी:) सोमलता आदी औषधी (देवभ्य:) पृथ्वी (वृक्ष, वनस्पती, लता, आदी) पासून त्रियुगम्‌) तीन वर्ष (पुरा) (पूर्वी:) पूर्ण सुख वा लाभ देण्यात उत्तम (अशा (जाता:) (प्रसिद्ध आहेत. अशा औषधी (बभ्रूणाम्‌) घेणाऱ्या रोग्यांच्या (शतम्‌) शंभर (च) आणि (सप्त) सात (धर्मान) म्हणजे शरीरातील 107 मर्मस्थानांपर्यंत जातात (आणि रोग्याला बरे करतात) (अहम्‌) मी वैद्य अशा गुणकारी औषधींना (नु) शीघ्र (मनै) जाणावे (अशा औषधांचा त्वरित शोध लावून सर्व मनुष्यांना रोगरहित करावे) ॥75॥
Essence
भावार्थ - मनुष्यांकरिता उचित आहे की त्यांनी प्रथम पृथ्वी आणि जल यामध्ये उत्पन्न होणाऱ्या औषधीनां प्राप्त करावे. नंतर त्या औषधीनां तीन वर्षापर्यंत योग्य प्रमाणात पक्व होऊ द्यावे आणि वैद्यकशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांचे सेवन करावे. अशा योग्य नियम-विद्यानादीप्रमाणे सेवन केलेल्या औषधी शरीरातील सर्व भागात व्याप्त होतात आणि शरीरातील रोग नष्ट करून मनुष्याला सुखी करतात ॥75॥
Subject
मनुष्यांनी रोगी झाल्यास वा रोगापासून वाचण्यासाठी औषधीचे सेवन अवश्‍य करावे, पुढील मंत्रात याविषयी प्रतिपादन केले आहे -