Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 74

117 Mantra
12/74
Devata- अश्विनौ देवते Rishi- कुमारहारित ऋषिः Chhand- आर्षी जगती Swara- निषादः
Mantra with Swara
स॒जूरब्दो॒ऽअय॑वोभिः स॒जूरु॒षाऽअरु॑णीभिः। स॒जोष॑साव॒श्विना॒ दꣳसो॑भिः स॒जूः सूर॒ऽएत॑शेन स॒जूर्वै॑श्वान॒रऽइड॑या घृ॒तेन॒ स्वाहा॑॥७४॥

स॒जूरिति॑ स॒ऽजूः। अब्दः॑। अय॑वोभि॒रित्यय॑वःऽभिः। स॒जूरिति॑ स॒ऽजूः। उ॒षाः। अरु॑णीभिः। स॒जोष॑सा॒विति॑ स॒जोष॑ऽसौ। अ॒श्विना॑। दꣳसो॑भि॒रिति॒ दꣳसः॑ऽभिः। स॒जूरिति॑ स॒ऽजूः। सूरः॑। एत॑शेन। स॒जूरिति॑ स॒ऽजूः। वै॒श्वा॒न॒रः। इड॑या। घृ॒तेन॑। स्वाहा॑ ॥७४ ॥

Mantra without Swara
सजूरब्दोऽअयवोभिः सजूरुषा अरुणीभिः सजोषसावश्विना दँसोभिः सजूः सूरऽएतशेन सजूर्वैश्वानरऽइडया घृतेन स्वाहा ॥

सजूरिति सऽजूः। अब्दः। अयवोभिरित्ययवःऽभिः। सजूरिति सऽजूः। उषाः। अरुणीभिः। सजोषसाविति सजोषऽसौ। अश्विना। दꣳसोभिरिति दꣳसःऽभिः। सजूरिति सऽजूः। सूरः। एतशेन। सजूरिति सऽजूः। वैश्वानरः। इडया। घृतेन। स्वाहा॥७४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो आपण सर्वजण एकमेकाशी अशाप्रकारे वागू की ज्याप्रकारे (अवयवोभि:) क्षण आदी आपल्या अवयवांनी वा अवयवां (सजू:) सह (अब्द:) एक वर्ष बनते (क्षणाक्षणाने दिवसरात्र व नंतर पक्ष-मास पूर्ण होऊन एक वर्ष बनते. क्षण व वर्ष परिणामी एक आहेत) ज्याप्रमाणे (अरुणीभि:) लालभांती (सजू:) सह (उषा:) प्रभात बनते (प्रभातकाळची लालिमा व प्रभात यात अंतर करणे अशक्य आहे.) ज्याप्रमाणे (दंसोभि:) कर्मांने (परिणाम व प्रभावाने) (सजोषसौ) एक समान परिणाम करणारे (अश्‍विना) प्राण आणि अपान आहेत. ज्याप्रमाणे (एतशेन) धावणाऱ्या घोड्यासारख्या वेगवती किरणे अथवा वायु लहरी (सजू:) सह (सूर:) सूर्य एक आहे. (दोन्हीत भेद नाही) तसेच ज्याप्रमाणे (इडया) अन्न आदी देणाऱ्या पृथ्वीचा संबंध (घृतेन) पाण्याशी आहे आणि (स्वाहा) सत्यवचनाचा (नियमांचा) (सजू:) संबंध (वैश्‍वानर:) विद्युतरुप अग्नीशी आहे, त्याप्रमाणे हे माणसांनो, आपणही एकमेकाशी असाच एकत्वाचा संबंध ठेवू. (मनुष्यांनी क्षण-वर्ष, बलिमा-प्रभातकाळ, कार्य-प्राणअपान, पवन-सूर्य, अन्न-पृथ्वी, सत्यनियम-अग्नी याप्रमाणे एकत्वाचे नाते ठेवावे) ॥74॥
Essence
भावार्थ - माणसामाणसात जितका मैत्रीभाव असेल, तितकेच सुख आणि जर विरोधभाव असेल, तर दु:ख होणे अपरिहार्य आहे. याकरिता सर्व स्त्री-पुरुषांनी एकमेकाशी प्रेमाने व एकमेकाला सहकार्य देत जगावे ॥74॥
Subject
माणसांनी कशाप्रकारे (कोणत्या उपायाने) सुखी होता येईल, पुढील मंत्रात याविषयी सांगितले आहे -