Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 73

117 Mantra
12/73
Devata- अघ्न्या देवताः Rishi- कुमारहारित ऋषिः Chhand- भुरिगार्षी गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
विमु॑च्यध्वमघ्न्या देवयाना॒ऽअग॑न्म॒ तम॑सस्पा॒रम॒स्य। ज्योति॑रापाम॥७३॥

वि। मु॒च्य॒ध्व॒म्। अ॒घ्न्याः॒। दे॒व॒या॒ना॒ इति॑ देवऽयानाः। अग॑न्म। तम॑सः। पा॒रम्। अ॒स्य। ज्योतिः॑। आ॒पा॒म॒ ॥७३ ॥

Mantra without Swara
विमुच्यध्वमघ्न्या देवयाना अगन्म तमसस्पारमस्य ज्योतिरापाम ॥

वि। मुच्यध्वम्। अघ्न्याः। देवयाना इति देवऽयानाः। अगन्म। तमसः। पारम्। अस्य। ज्योतिः। आपाम॥७३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (वैद्यजन गृहस्थजनांना/कृषकांना संबोधून म्हणताहेत) हे मनुष्यांनो, जसे तुम्ही गृहस्थी/कृषकलोक (अहन्या:) अहिंसनीय व रक्षणीय आणि (देवयाना:) दिव्यगुणांची प्राप्ती करून देणाऱ्या गायीच पालन करीत आहात आणि त्यामुळे उत्तम सुसंस्कारित अन्न खाऊन रोगादीपासून (विभुच्यध्वम्‌) दूर राहत आहात, त्याप्रमाणे आम्ही (वैद्य आणि सूज्ञ मंडळी) देखील नीरोग राहू (वा राहत आहोत) तसेच ज्याप्रमाणे तुम्ही गृहाश्रमीजन (तमस:) रात्र (पारम्‌) पार करून (रात्र शांतपणे व्यतीत करून) सकाळी नि उठता) त्याचप्रमाणे आम्ही देखील (अगन्म) असावे ज्याप्रमाणे रात्र संपल्यानंतर तुम्ही गृहाश्रमी (अस्य) या सूर्याचा (ज्योति:) प्रकाश पाहता, त्याप्रमाणे आम्ही (वैधनही) तो सूर्योदय व सूर्यप्रकाश पहावा (आमचे दिवसरात्र निर्भयनिश्‍चित असावेत) ॥73॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. सर्व मनुष्यांकरिता आवश्‍यक व उचित आहे की त्यांनी गौ आदी पशूंची कदापी हत्या करूं नये, हत्या करवूं नये आणि कोणाला गौ हत्या करू देऊ नये. ज्याप्रमाणे सुर्योदय झाल्यानंतर रात्र संपते, तद्वत वैद्यकशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पथ्याचे नियम पाळावेत, पथ्य अशा अन्नादी पदार्थांचे सेवन करावे आणि रोगराई पासून दूर रहावे. (रोगरुप रात्र कधीही येणार नाही) ॥73॥
Subject
मनुष्यांनी गौ आदी पशूंचे पालन-रक्षण करून त्याद्वारे दूध, घृत आदीं वस्तूंचे वर्धन करावे आणि आनंदात रहावे, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादित आहे -