Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 72

117 Mantra
12/72
Devata- मित्रादयो लिङ्गोक्ता देवताः Rishi- कुमारहारित ऋषिः Chhand- आर्ची पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
कामं॑ कामदुघे धुक्ष्व मि॒त्राय॒ वरु॑णाय च। इन्द्रा॑या॒श्विभ्यां॑ पू॒ष्णे प्र॒जाभ्य॒ऽओष॑धीभ्यः॥७२॥

काम॑म्। का॒म॒दु॒घ॒ इति॑ कामऽदुघे। धु॒क्ष्व॒। मि॒त्राय॑। वरु॑णाय। च॒। इन्द्रा॑य। अ॒श्विभ्या॒मित्य॒श्विऽभ्या॑म्। पू॒ष्णे। प्र॒जाभ्य॒ इति॑ प्र॒जाऽभ्यः॑। ओष॑धीभ्यः ॥७२ ॥

Mantra without Swara
कामङ्कामदुघे धुक्ष्व मित्राय वरुणाय च । इन्द्रायाश्विभ्यां पूष्णे प्रजाभ्यऽओषधीभ्यः ॥

कामम्। कामदुघ इति कामऽदुघे। धुक्ष्व। मित्राय। वरुणाय। च। इन्द्राय। अश्विभ्यामित्यश्विऽभ्याम्। पूष्णे। प्रजाभ्य इति प्रजाऽभ्यः। ओषधीभ्यः॥७२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (कामदुधे) (उत्कृष्ट रुचकर सैंपाक करून) आमची भोजनेच्छा पूर्ण करणाऱ्या हे सैपाकीणबाई, भूमी ज्याप्रमाणे (शुद्ध पुष्टिकर) धान्य देते, तद्वत पाककर्माद्ारे रुचकर अन्न शिजवून तू (मित्राय) स्नेहीजनांसाठी (वरूणाय) वरणीय विद्वानांसाठी (च) आणि अतिथी-अभ्यागतांसाठी तसेच (इन्द्राय) परमऐश्‍वर्यशाली (श्रेष्ठी, राजा, धनिक आदी) लोकांसाठी उत्तम सुसंस्कृत अन्न तयार कर. तसेच (अश्‍विभ्याम्‌) भोजन करणाऱ्यांच्या शरीरातील पान-अपान वायूंच्या (पूष्णे) पुष्टतेकरिता आणि (प्रजाभ्य:) आमच्या (गृहस्थजनांच्या) संततीसाठी (औषधीभ्य:) सोमलता आदी औषधी (यव आदी धान्य यांद्वारे सर्वांच्या (कामम्‌) इच्छेप्रमाणे (सुस्वादु भोजन देऊन त्यांना) (धुक्ष्व) तृप्त कर ॥72॥
Essence
भावार्थ - जी स्त्री वा जो पुरुष सैंपाक करणारा असेल, तिने/त्याने पाकविद्या शिकावी, नंतर सर्वांना प्रिय असे रुचकर पदार्थ तयार करून सर्वांना भोजन द्यावे. ते स्वच्छ व पुष्टिकर अन्न सेवन करून सर्वजण नीरोग राहतील, असे करावे ॥72॥
Subject
सैंपाक करणाऱ्या स्त्रीने यत्नपूर्वक सुस्वादु अन्न, व्यंजनादी तयार करावेत, पुढील मंत्रात हा विषय कथित आहे-