Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 64

117 Mantra
12/64
Devata- निर्ऋतिर्देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
यस्या॑स्ते घोरऽआ॒सञ्जु॒होम्ये॒षां ब॒न्धाना॑मव॒सर्ज॑नाय। यां त्वा॒ जनो॒ भूमि॒रिति॑ प्र॒मन्द॑ते॒ निर्ऋ॑तिं त्वा॒हं परि॑ वेद वि॒श्वतः॑॥६४॥

यस्याः॑। ते॒। घो॒रे॒। आ॒सन्। जु॒होमि॑। ए॒षाम्। ब॒न्धाना॑म्। अ॒व॒सर्ज॑ना॒येत्य॑व॒ऽसर्ज॑नाय। याम्। त्वा॒। जनः॑। भूमिः॑। इति॑। प्र॒मन्द॑त॒ इति॑ प्र॒ऽमन्द॑ते। निर्ऋ॑ति॒मिति॒ निःऽऋ॑तिम्। त्वा॒। अ॒हम्। परि॑। वे॒द॒। वि॒श्वतः॑ ॥६४ ॥

Mantra without Swara
यस्यास्ते घोर आसन्जुहोम्येषाम्बन्धानामवसर्जनाय । यान्त्वा जनो भूमिरिति प्रमन्दते निरृतिं त्वाहम्परि वेद विश्वतः ॥

यस्याः। ते। घोरे। आसन्। जुहोमि। एषाम्। बन्धानाम्। अवसर्जनायेत्यवऽसर्जनाय। याम्। त्वा। जनः। भूमिः। इति। प्रमन्दत इति प्रऽमन्दते। निर्ऋतिमिति निःऽऋतिम्। त्वा। अहम्। परि। वेद। विश्वतः॥६४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (पती स्वपत्नीला उद्देशून) हे (घोरे) दुष्टांना भयदायक वाटणाऱ्या पत्नी (ते) तुझ्या (यस्था:) ज्या मुखात (तुझा भोजनात) मी (एषाम्‌) या (बन्धानाम्‌) दु:खकारक आणि हानिकारक (अन्न व भोज्य पदार्थांचा (अव सर्जनाय) प्रयोग वा उपभोग करण्याचे (जुहोमि) टाळतो, कारण तुझा हा (जन:) माणूस (म्हणजे मी तुझा पती) तुला (भूमिरिति) पृथ्वीप्रमाणे मानून (याम्‌) ज्या (त्वा) तुला मी (प्रमन्दते) प्रसन्न करतो, आणि (अहम्‌) मी (विश्‍वत:) सर्वदृष्ट्या (निर्ऋतम्‌) (त्या) तुला भूमीप्रमाणे अधिकाधिक (परि) (वेद) पूर्णपणे जाणून घेण्याचा यत्न करतो. माझ्याप्रमाणे तू देखील मला सर्वदृष्ट्या पूर्णपणे जाणून गे. (तुझी माझी वाणी, विचार एक असावेत, दोघांनी एकमेकास पूर्णत: समजून घ्यावे) ॥64॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार व त्या अलंकाराचा एक उपभेद-वाचकलुप्तोपमा या दोन अलंकारांचा प्रयोग केला आहे. ज्याप्रमाणे एक पती आनंद प्राप्तर्थ पत्नीला आपली मानतो, तसेच पत्नीने देखील आनंद देण्यासाठी व घेण्यासाठी पतीला आपला मानावा. कारण की गृहाश्रमामध्ये पत्नी पतिव्रता असेल व पती पत्नीव्रत असेल, तर गृहाश्रम सुखाचा असू शकेल. पत्नी शेत आणि पुरुष बीज व बलवान अशा शुद्ध दोघांच्या समागमाने उत्तम कोटींची संताने उपजतील आणि गृहात सर्वदा कल्याण मंगल वाढत जाईल. विवेकी व्यक्तींनी हे सत्य समजून घ्यावे. ॥64॥
Subject
कोणत्या उद्देशाकरिता पती-पत्नीने एकत्र यावे, पुढील मंत्रात याविषयी प्रतिपादन केले आहे-