Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 63

117 Mantra
12/63
Devata- निर्ऋतिर्देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- भुरिगार्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
नमः॒ सु ते॑ निर्ऋते तिग्मतेजोऽय॒स्मयं॒ विचृ॑ता ब॒न्धमे॒तम्। य॒मेन॒ त्वं य॒म्या सं॑विदा॒नोत्त॒मे नाके॒ऽअधि॑ रोहयैनम्॥६३॥

नमः। सु। ते॒। नि॒र्ऋ॒त॒ इति॑ निःऽऋते। ति॒ग्म॒ते॒ज॒ इति॑ तिग्मऽतेजः। अ॒य॒स्मय॑म्। वि। चृ॒त॒। ब॒न्धम्। ए॒तम्। य॒मेन॑। त्वम्। य॒म्या। सं॒वि॒दा॒नेति॑ सम्ऽविदा॒ना। उ॒त्त॒म इत्यु॑त्ऽत॒मे। नाके॑। अधि॑। रो॒ह॒य॒। ए॒न॒म् ॥६३ ॥

Mantra without Swara
नमः सु ते निरृते तिग्मतेजो यस्मयँ वि चृता बन्धमेतम् । यमेन त्वँयम्या सँविदानोत्तमे नाके अधि रोहयैनम् ॥

नमः। सु। ते। निर्ऋत इति निःऽऋते। तिग्मतेज इति तिग्मऽतेजः। अयस्मयम्। वि। चृत। बन्धम्। एतम्। यमेन। त्वम्। यम्या। संविदानेति सम्ऽविदाना। उत्तम इत्युत्ऽतमे। नाके। अधि। रोहय। एनम्॥६३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे ( निर्ऋते) सदा सत्याचरण करणाऱ्या स्त्रिये, (तिग्मतेज:) तीव्र तेजवान (चमचमणारे व प्रभावशाली) असे (ते तुझे ने (अयस्मयम्‌) स्वर्ण आणि (नम:) अन्न आदी पदार्थ आहेत, त्यांचा (त्वम्‌) तू (एतम्‌) (बन्धम्‌) बंधनाचे कारण जे अज्ञान, त्या अज्ञानापासून तू (सुविचृत) चांगल्याप्रकारे मुक्त हो (स्वर्ण आदी धातू व भोज्य व पदार्थ यांच्याविषयीचे अज्ञान दूर सारून त्यांचे सद्पयोग जाणून घे) तसेच (यमेय) न्यायाधीश आणि असलेल्या तुझ्या पतीसह तुझी (यम्मा) न्याय करणारी त्याची पत्नी हो अशारीतीने तू (संविदाना) सम्यक्‌प्रकारे बुद्धिमती होऊन (एनम्‌) आपल्या या पतीला उत्तमे) (नाके) श्रेष्ठ आनंद भोगण्याच्या कमी (अधिरोह्य) सहायक हो ॥63॥
Essence
भावार्थ - स्त्रियांनो, तुम्हास उचित आहे की ज्याप्रमाणे ही पृथ्वी अग्नी, सुवर्ण आणि अन्न आदी पदार्थांनी समृद्ध आहे, तसेच तुम्ही देखील व्हा. ज्याप्रमाणे तुमचा न्यायाधीश असलेला पती अपराधी लोकांना दंडित करतो आणि सत्य व न्याय्य रीतीने विचार करून निरपराधी जनांना मुक्त करतो वा त्यांचा सत्कार करतो आणि (अशा आपल्या निष्पक्षवृत्तीने) तुम्हाला आनंदित करतो, तसे तुम्हीदेखील त्याला (आपल्या सदाचरण, सत्यभाषणादी गुणांनी आनंदित करा. ॥63॥
Subject
यानंतर मंत्रात, स्त्रियांनी कसे असावे (स्त्रिया अशा असाव्यात) याविषयी प्रतिपादन केले आहे -