Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 62

117 Mantra
12/62
Devata- निर्ऋतिर्देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- निचृत् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
असु॑न्वन्त॒मय॑जमानमिच्छ स्ते॒नस्ये॒त्यामन्वि॑हि॒ तस्क॑रस्य। अ॒न्यम॒स्मदि॑च्छ॒ सा त॑ऽइ॒त्या नमो॑ देवि निर्ऋते॒ तुभ्य॑मस्तु॥६२॥

असु॑न्वन्तम्। अय॑जमानम्। इ॒च्छ॒। स्ते॒नस्य॑। इ॒त्याम्। अनु॑। इ॒हि॒। तस्क॑रस्य। अ॒न्यम्। अ॒स्मत्। इ॒च्छ॒। सा। ते॒। इ॒त्या। नमः॑। दे॒वि॒। नि॒र्ऋ॒त॒ इति॑ निःऽऋते। तुभ्य॑म्। अ॒स्तु॒ ॥६२ ॥

Mantra without Swara
असुन्वन्तमयजमानमिच्छ स्तेनस्येत्यामन्विहि तस्करस्य । अन्यमस्मदिच्छ सा तऽइत्या नमो देवि निरृते तुभ्यमस्तु ॥

असुन्वन्तम्। अयजमानम्। इच्छ। स्तेनस्य। इत्याम्। अनु। इहि। तस्करस्य। अन्यम्। अस्मत्। इच्छ। सा। ते। इत्या। नमः। देवि। निर्ऋत इति निःऽऋते। तुभ्यम्। अस्तु॥६२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (विद्वज्जन स्त्रियांना हितकर उपदेश देत आहे) (निऋते) भूमीप्रमाणे (दृढ, अन्नदात्री व उपकार) असलेली हे (देवी) विदुषी विवेकी स्त्रीला तू (अस्मत्‌) आम्हापासून (विद्वान उपदेशक लोकांहून) जे वेगळे (स्तेनस्य) अप्रसिद्ध चोर आणि तस्कर) प्रसिद्धचोर आणि त्याप्रकारचे अन्य जे जन दुष्ट कुमार्गी आहेत, त्यांच्यापेक्षा (अन्यम्‌) भिन्न असलेला (सन्मार्गी व सुष्ट असलेला पती मिळण्याची (इच्छा) कामना कर. तसेच (असुन्वतम्‌) अभिषन आदी क्रिया (यज्ञ, स्नान, सोमरसच्यावन आदी) न करणाऱ्या आणि (अयजमानम्‌) दान, धर्म न करणाऱ्या माणसाची (इच्छा) इच्छा कदापि करू नकोस (तसा अयाज्ञिक, कृषण पती करू नकोस) (इत्याम्‌) जे आवश्‍यक क्रिया-कर्मादी आहेत, त्यांच्याविषयी (अन्विहि) जाणून घेण्याची, शिकण्याची कामना सदैव करीत रहा. (सा) तुझ्या त्या कामना पूर्ण व्हाव्यात. (तुभ्यम्‌) तुझ्यासाठी (नम:) अन्न आदी मिळो अथवा समाजात तुझा सत्कार होवो. ॥62॥
Essence
भावार्थ - स्त्रियांनो, तुम्हास उचित आहे की जे अपुरुषार्थी, निरुघोगी चोर आदी कुकर्मी माणसाची पती म्हणून निवड कदापि करू नका. आप्त व सदाचारी पुरुषांची व त्याप्रमाणे वागणाऱ्या नीतीमान पुरुषांची पती म्हणून निवड करा. ज्याप्रमाणे ही पृथ्वी अनेक उत्तम खळे देऊन मनुष्यांवर उपकार करते, तुम्हीही तशाच व्हा. तुम्ही अशा प्रकारे गुणवती झाल्यास आम्ही (विद्वज्जन) तुम्हाला नमस्कार करू वा करतो. जसे आम्ही आळशी वा चौरकर्म करणाऱ्या लोकांपासून दूर राहतो, तसे तुम्ही देखील व्हा ॥62॥
Subject
स्त्रियांसाठी कोणत्या प्रकारचा पती मिळण्याची इच्छा करूं नये, (पती कसा असूं नये) याविषयी पुढील मंत्रात प्रतिपादन केले आहे-