Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 61

117 Mantra
12/61
Devata- पत्नी देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
मा॒तेव॑ पुत्रं पृ॑थि॒वी पु॑री॒ष्यम॒ग्नि स्वे योना॑वभारु॒खा। तां विश्वै॑र्दे॒वैर्ऋ॒तुभिः॑ संविदा॒नः प्र॒जाप॑तिर्वि॒श्वक॑र्म्मा॒ वि मु॑ञ्चतु॥६१॥

मा॒तेवेति॑ मा॒ताऽइ॑व। पु॒त्रम्। पृ॒थि॒वी। पु॒री॒ष्य᳖म्। अ॒ग्निम्। स्वे। यौनौ॑। अ॒भाः॒। उ॒खा। ताम्। विश्वैः॑। दे॒वैः॒। ऋ॒तुभि॒रित्यृ॒तुऽभिः॑। सं॒वि॒दा॒न इति॑ सम्ऽविदा॒नः। प्र॒जाप॑ति॒रिति॑ प्र॒जाऽप॑तिः। वि॒श्वक॒र्म्मेति॑ वि॒श्वऽक॑र्मा। वि। मु॒ञ्च॒तु॒ ॥६१ ॥

Mantra without Swara
मातेव पुत्रम्पृथिवी पुरीष्यमग्निँ स्वे योनावभारुखा । ता विश्वैर्देवैरृतुभिः सँविदानः प्रजापतिर्विश्वकर्मा वि मुञ्चतु ॥

मातेवेति माताऽइव। पुत्रम्। पृथिवी। पुरीष्यम्। अग्निम्। स्वे। यौनौ। अभाः। उखा। ताम्। विश्वैः। देवैः। ऋतुभिरित्यृतुऽभिः। संविदान इति सम्ऽविदानः। प्रजापतिरिति प्रजाऽपतिः। विश्वकर्म्मेति विश्वऽकर्मा। वि। मुञ्चतु॥६१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (उखा) ज्ञान प्राप्त करण्यात व ज्ञान देण्यात समर्थ अशी आणि (पृथिवी) भूमीप्रमाणे पुष्टिदायिनी जी विदुषी स्त्री आहे (वा समाज असते) ती (स्वे) आपल्या योनौ) गर्भाशयामध्ये (आश्रमाखाली) (पुरीष्यम्‌) पुष्टिकारक गुण समृद्ध करते आणि (अग्निम्‌) विद्युतेप्रमाणे मोहक प्रकाशाने युक्त म्हणजे कीर्तिमंत अशा (पुत्रम्‌) पुत्राला) (मातेव) मातेप्रमाणे (अभा:) धारण करते. (विदुषी स्त्री आपल्या शिष्याला पुत्राप्रमाणे मानून ज्ञानप्रदान करण्यासाठी त्याला आपल्या गृही वा आश्रमात ठेवते आणि भूमीप्रमाणे पुष्ट आणि विद्युतप्रकाशाप्रमाणे कीर्तिमंत करून त्या शिष्याचे मातेप्रमाणे पालन करते) अशा (ताम्‌) त्या विदुषी स्त्रीला (संविदान:) सम्यकप्रकारे प्रेरणा देत (विश्‍वकर्मा व सर्व उत्तम कर्म करणारा (प्रजापति:) परमेश्‍वर त्या विदुषाला (विश्‍वै:) सर्व (दैवै:) दिव्यगुणांनी युक्त करो आणि तिला (ऋतुभि:) वसंत आदी ऋतूंमध्ये होणाऱ्या दु:खांपासून सदैव (विमुग्चतु) दूर ठेवो (त्या अशा विदुषी स्त्रीला तिच्या ज्ञानदान कार्यात कोणत्या प्रकारची विष बाधा येऊ नये परमेश्‍वराने तिच्यावर अशी कृपा करावी) ॥61॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे एक माता आपल्या संतानाला जन्म देऊन त्याचे पालन करते, त्याचप्रमाणे ही पृथ्वी कारणरूप विद्युतेला प्रकट करू (भूगर्भात त्या शक्तीचे) रक्षण करते. जसे परमेश्‍वर पृथ्वी आदींना धारण करतो, तसेच सर्व गृहनक्षत्रादींना निश्‍चित परिधिमध्ये चालवितो आणि नंतर प्रलयकाळी त्या सर्व पदार्थांना भिन्न-भिन्न करतो (सूक्ष्म अनुरुपात आणतो) त्याप्रमाणे सर्व विद्वान वैज्ञानिकांसाठी ही आवश्‍यक आहे की त्यांनी आपापल्या बुद्धिसामर्थ्याप्रमाणे सृष्टीतील सर्व पदार्थांचे ज्ञान प्राप्त करावे आणि कार्यसिद्धीसाठी त्या पदार्थांचा उपयोग घ्यावा. ॥61॥
Subject
missing