Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 6

117 Mantra
12/6
Devata- अग्निर्देवता Rishi- वत्सप्रीर्ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अक्र॑न्दद॒ग्नि स्त॒नय॑न्निव॒ द्यौः क्षामा॒ रेरि॑हद् वी॒रुधः॑ सम॒ञ्जन्। स॒द्यो ज॑ज्ञा॒नो वि हीमि॒द्धोऽअख्य॒दा रोद॑सी भा॒नुना॑ भात्य॒न्तः॥६॥

अक्र॑न्दत्। अ॒ग्निः। स्त॒नय॑न्नि॒वेति॑ स्त॒नय॑न्ऽइव। द्यौः। क्षामा॑। रेरि॑हत्। वी॒रुधः॑। सम॒ञ्जन्निति॑ सम्ऽअ॒ञ्जन्। स॒द्यः। ज॒ज्ञा॒नः। वि। हि। ई॒म्। इ॒द्धः। अख्य॑त्। आ। रोद॑सीऽइति॒ रोद॑सी। भा॒नुना॑। भा॒ति॒। अ॒न्तरित्य॒न्तः ॥६ ॥

Mantra without Swara
अक्रन्ददग्नि स्तनयन्निव द्यौः क्षामा रेरिहद्वीरुधः समञ्जन् । सद्यो जज्ञानो वि हीमिद्धोऽअख्यदा रोदसी भानुना भात्यन्तः ॥

अक्रन्दत्। अग्निः। स्तनयन्निवेति स्तनयन्ऽइव। द्यौः। क्षामा। रेरिहत्। वीरुधः। समञ्जन्निति सम्ऽअञ्जन्। सद्यः। जज्ञानः। वि। हि। ईम्। इद्धः। अख्यत्। आ। रोदसीऽइति रोदसी। भानुना। भाति। अन्तरित्यन्तः॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ हे मनुष्यांनो (प्रजाजनहो) हा जो आपला सभापती राजा (सद्य:) एका दिवसात (त्वरित वा अविशीप्रमाणे) (जज्ञान:) (सर्व तथ्य वा परिस्थिती) जाणणारा आहे, तो (घौ:) सूर्यप्रकाश आणि (अग्नी:) विद्युदग्निप्रमाणे (सनयन्निव) भाषण नाद करीत शत्रूंवर (अक्रन्दत्‌) आक्रमक करतो, तसेच (क्षामा) पृथ्वी ज्याप्रमाणे आक्रमण करतो, तसेच (क्षामा) पृथ्वी ज्याप्रमाणे (विरुध:) वृक्षांना फुळा-फुलांनी समृद्ध करते, तद्वत हा सभापती प्रजाजनांना सुखी करण्यासाठी (रेरिहत्‌) चांगल्या-वाईट कर्मांचे फळ शीघ्र देतो. (वाईट कर्मांचे फळ वाईट मिळते, पण ते अंती जिवाच्या सुखासाठी असते) तसेच हा सूर्य (इद्ध:) प्रदीप्त वा जाज्वल्यमान होऊन (समंजन्‌) सर्व पदार्थांना चांगल्याप्रकारे प्रकाशित करतो आणि (रोदसी) आकाश व पृथ्वीला (व्यंख्यत्‌) प्रकाशमय करतो आणि (रोदसी) आकाश व पृथ्वीला (व्यंख्यत्‌) प्रकाशमय करतो आणि आपल्या (रोदसी) आकाश व पृथ्वीला (व्यंख्यत्‌) प्रकाशमय करतो आणि आपल्या (भानुना) अति तेजस्वी दीप्तीद्वारे (अन्त:) सर्व लोकलोकांतरामधे (आभाति) चमकत असतो, त्याप्रमाणे हे प्रजाजनहो, जो सभापती सूर्य, विद्युत आणि वृक्षाप्रमाणे आपल्या शुभकर्मांमुळे प्रसिद्ध वा यशवंत आहे, त्यासच तुम्ही राज्यशासन कार्यासाठी मान्यता द्या (वा त्यास सहकार्य करा) ॥6॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा आणि वाचकलुप्तोपमा हे अलंकार आहेत. हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे सूर्य सर्व लोकांमध्ये स्थित असून (मध्यभागी वा केंद्रस्थानी असून) सर्व पदार्थांना प्रकाशित आणि आकर्षित करतो आणि जसे पृथ्वी पुष्कळ फळें-फुलें सर्वांना देते, त्याप्रमाणे तशा गुणवान विद्वान मनुष्याना तुम्ही राज्यशासनात नेमून त्यापासून चांगले लाभ घ्या वा त्याला सत्कार्यासाठी प्रवृत्त करा ॥6॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय पुढील मंत्रातही आहे -