Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 59

117 Mantra
12/59
Devata- अग्निर्देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- भुरिगुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
अग्ने॒ त्वं पु॑री॒ष्यो रयि॒मान् पु॑ष्टि॒माँ२ऽअ॑सि। शि॒वाः कृ॒त्वा दिशः॒ सर्वाः॒ स्वं योनि॑मि॒हास॑दः॥५९॥

अग्ने॒। त्वम्। पु॑री॒ष्यः᳖। र॒यि॒मानिति॑ रयि॒ऽमान्। पु॒ष्टि॒मानिति॑ पुष्टि॒ऽमान्। अ॒सि॒। शि॒वाः। कृ॒त्वा। दिशः॑। सर्वाः॑। त्वम्। योनि॑म्। इ॒ह। आ। अ॒स॒दः॒ ॥५१ ॥

Mantra without Swara
अग्ने त्वं पुरीष्यो रयिमान्पुष्टिमाँ असि । शिवाः कृत्वा दिशः सर्वाः योनिमिहासदः॥

अग्ने। त्वम्। पुरीष्यः। रयिमानिति रयिऽमान्। पुष्टिमानिति पुष्टिऽमान्। असि। शिवाः। कृत्वा। दिशः। सर्वाः। त्वम्। योनिम्। इह। आ। असदः॥५१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (उपदेशक आचार्यादीप्रत राजाची विनंती) हे (अग्ने) उपदेशक आचार्य वा विद्वान, (त्वम) आपण (इह) या संसारात (वा या राज्यात) (पुरीष्य:) एकमत निर्माण करून स्थापित करून, एकत्व प्रतिपादित करणारे आणि (रयियाम्‌) विद्या व ज्ञानरुप धनाने संपन्न आहा. तसेच (पुष्टिमान्‌) प्रशंसनीय-शारीरिक आत्मिकशक्तीने समृद्ध (असि) आहात. म्हणून आपणांस विनंती की) आपण (सर्वा:) दिश:) सर्व दिशांमध्ये उपदेशास पात्र असे जे जे प्रजाजन आहेत , त्यांना (शिवा:) आपल्या कल्याणकारी उपदेशाद्वारे (कृत्वा) उपकृत करून (स्वम्‌) (योनिम्‌) सुखदायक आणि दु:खनाशक असे तुमचे जे घर आहे, त्या घरात आम्हांसाठी (आसद:) प्राप्त व्हा. (आम्ही तुमच्या घरी, आश्रयात वा विद्यालयात उपदेशग्रहणासाठी येतो, आपण उपदेश देऊन उपकृत करा)॥59॥
Essence
भावार्थ - राजा आणि बुद्धिमान प्रजाजनांचे कर्तव्य आहे की त्यांनी जितेंद्रिय, धर्मात्मा, परोपकाराविषयी आवड असणारे असे जे जे विद्वज्जन राज्यात असतील, त्यांना प्रजंला धर्मोपदेश करण्यासाठी नियुक्त करावे. तसेच उपदेशक विद्वानांनीदेखील सर्व इच्छुक जनांना सर्वतोपरी प्रयत्न करून उत्तम शिक्षण द्यावे आणि सर्वांना एका धर्मात (विचार व सिद्धांत) यांमध्ये आणून प्रजेतील विरोधवृत्ती नष्ट करून सर्वांना सुखी करावे ॥59॥
Subject
अध्ययन आणि उपदेशाकरिता कोणाची निवड करावी, याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -