Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 57

117 Mantra
12/57
Devata- अग्निर्देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- भुरिगुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
समि॑त॒ꣳ संक॑ल्पेथा॒ संप्रि॑यौ रोचि॒ष्णू सु॑मन॒स्यमा॑नौ। इष॒मूर्ज॑म॒भि सं॒वसा॑नौ॥५७॥

सम्। इ॒त॒म्। सम्। क॒ल्पे॒था॒म्। संप्रि॑या॒विति॒ सम्ऽप्रि॑यौ। रो॒चि॒ष्णूऽइति॑ रोचि॒ष्णू। सु॒म॒न॒स्यमा॑नाविति॑ सुऽमन॒स्यमा॑नौ। इष॑म्। ऊर्ज॑म्। अ॒भि। सं॒वसा॑ना॒विति॑ स॒म्ऽवसा॑नौ ॥५७ ॥

Mantra without Swara
समितँ सङ्कल्पेथाँ सम्प्रियौ रोचिष्णू सुमनस्यमानौ । इषमूर्जमभि सँवसानौ ॥

सम्। इतम्। सम्। कल्पेथाम्। संप्रियाविति सम्ऽप्रियौ। रोचिष्णूऽइति रोचिष्णू। सुमनस्यमानाविति सुऽमनस्यमानौ। इषम्। ऊर्जम्। अभि। संवसानाविति सम्ऽवसानौ॥५७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे पति-पत्नी, तुम्ही दोघे (संप्रियौ) एकमेकास प्रेम करणारे व्हा. (रोचिषण) विषयासक्तीपासून दूर, असल्यामुळे प्रशंसित व्हा. (सुमनस्यमानौ) एकमनाने कार्य करणाऱ्या विवेकी माणसांसारखे रहा. (सेवसानौ) सुंदर सुंदर वस्त्र आणि आभूषण धारण करा. (इषम्‌) आपल्या इच्छित वस्तूंसाठी (समितम्‌) मिळून प्रयत्न करा आणि (ऊर्जाम्‌) आपल्या कार्यशक्तीचा (अभि) समोर असलेल्या उद्दिष्टांसाठी (संकल्पेयाम्‌) उपरोण करा (शक्ति विभाजित होऊ देऊ नका. दोघांचे लक्ष्य एक असावे) ॥57॥
Essence
भावार्थ - पति-पत्नीने आपसातील विरोध भावनेचा सर्वथा त्याग करून एकमेकाविषयी प्रीतीभाव वाढत राहण्यासाठी यत्न करावा. तसेच श्रेष्ठ विचार करीत चांगले सुंदर वस्त्र-आभूषणादी धारण करावेत. अशाप्रकारे प्रयत्न केल्यास घराचे कल्याण होईल आणि आरोग्य होईल आणि आरोग्य वाढीस लागेल. जे गृहस्थजन याहून विपरीत वागत असतील, ते अवश्यमेव दु:खसागरात बुडून जातील ॥57॥
Subject
विवाहानंतर कसे वागावे, याविषयी पुढील मंत्रात पति-पत्नीला उपदेश केला आहे -