Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 56

117 Mantra
12/56
Devata- इन्द्रो देवता Rishi- सुतजेतृमधुच्छन्दा ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
इन्द्रं॒ विश्वा॑ऽअवीवृधन्त्समु॒द्रव्य॑चसं॒ गिरः॑। र॒थीत॑मꣳ र॒थीनां॒ वाजा॑ना॒ सत्प॑तिं॒ पति॑म्॥५६॥

इन्द्र॑म्। विश्वाः॑। अ॒वी॒वृ॒ध॒न्। स॒मु॒द्रव्य॑चस॒मिति॑ समु॒द्रऽव्य॑चसम्। गिरः॑। र॒थीत॑मम्। र॒थित॑म॒मिति॑ र॒थिऽत॑मम्। र॒थीना॑म्। र॒थिना॒मिति॑ र॒थिना॑म्। वाजा॑नाम्। सत्प॑ति॒मिति॒ सत्ऽपति॑म्। पति॑म् ॥५६ ॥

Mantra without Swara
इन्द्रँविश्वाऽअवीवृधन्त्समुद्रव्यचसङ्गिरः । रथीतमँ रथीनाँ वाजानाँ सत्पतिं पतिम् ॥

इन्द्रम्। विश्वाः। अवीवृधन्। समुद्रव्यचसमिति समुद्रऽव्यचसम्। गिरः। रथीतमम्। रथितममिति रथिऽतमम्। रथीनाम्। रथिनामिति रथिनाम्। वाजानाम्। सत्पतिमिति सत्ऽपतिम्। पतिम्॥५६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे स्त्रियांनो व हे पुरुषांनो, ज्याप्रमाणे (गिर:) वेदविद्याद्वारे संस्कारित वाणी (समुद्रव्यवसम्‌) समुद्राप्रमाणे विस्तृत (वाजानाम्‌) अशा युद्धात (विजय प्राप्त करण्यास साहाय्यभूत होते) आणि जसे (रथीनाम्‌) एक प्रशंसनीय रथी अनेक पुरुषांमधे (स्थीतमम्‌) अत्यंत प्रशंसनीय महारथी असतो, तसेच (सत्यतिम्‌) सत्य, ईश्‍वर, वेद, धर्म, आणि श्रेष्ठजन, या सर्वांचा रक्षक (पतिम्‌) सर्व ऐश्‍वर्यवान एक स्वामी (वा राजा) (अवीवृधन्‌) वृद्धी पाणि उन्नत्तीस प्राप्त होतो आणि (इन्द्रम्‌) परमैश्‍वर्यदायक होतो त्याप्रमाणे सर्व स्त्री-पुरुषांनी सर्व प्राण्यांचे ऐश्‍वर्य वा सुख वाढवावेत. (त्या एका गुणवान वीर-पुरुषास आदर्श मानून सर्वांनी त्याप्रमाणे वागावे) ॥56॥
Essence
भावार्थ - कुमार आणि कुमारी यांनी दीर्घकाळ ब्रह्मचर्य-पालन करून वेद्येचे सांगोपांग अध्ययन करून आणि (युवा झाल्यानंतर) स्वेच्छेने स्वयंवर विवाह करून ऐश्‍वर्यप्राप्तीकरिता यज्ञ करावेत. त्यांनी धर्मानुसार आचरण करून, व्यभिचारापासून अलिप्त राहून सुंदर उत्तम संतानांना जन्म द्यावा आणि सदैव परोपकार करण्यात व तल्लीन असावे. असे आचरण करणारे गृहाश्रमी स्त्री-पुरुष या संसारात आणि परलोकात (परजन्मी वा मोक्षावस्थेत) सुखी होतात. याविरुद्ध आचरण करणारे कदापि सुखी होत नाहीत ॥56॥
Subject
कुमार-कुमारिकेने (युवक-युवतींनी) अशा रीतीने वागले पाहिजे, पुढील मंत्रात हा विषय सांगितला आहे-