Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 55

117 Mantra
12/55
Devata- आपो देवताः Rishi- प्रियमेधा ऋषिः Chhand- विराडार्षीनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ताऽअ॑स्य॒ सूद॑दोहसः॒ सोम॑ꣳ श्रीणन्ति॒ पृश्न॑यः। जन्म॑न् दे॒वानां॒ विश॑स्त्रि॒ष्वा रो॑च॒ने दि॒वः॥५५॥

ताः। अ॒स्य॒। सूद॑दोहस॒ इति॒ सूद॑ऽदोहसः। सोम॑म्। श्री॒ण॒न्ति॒। पृश्न॑यः। जन्म॑न्। दे॒वाना॑म्। विशः॑। त्रि॒षु। आ। रो॒च॒ने। दि॒वः ॥५५ ॥

Mantra without Swara
ताऽअस्य सूददोहसः सोमँ श्रीणन्ति पृश्नयः । जन्मन्देवानाँविशस्त्रिष्वारोचने दिवः ॥

ताः। अस्य। सूददोहस इति सूदऽदोहसः। सोमम्। श्रीणन्ति। पृश्नयः। जन्मन्। देवानाम्। विशः। त्रिषु। आ। रोचने। दिवः॥५५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (त्याच मुली आदर्श गृहिणी होतात का?) ज्या (देवानाम्‌) दिव्य विद्वान पतीची सेवा करणाऱ्या आणि (सूद दोहस:) श्रेष्ठ पाचक वा आचारी प्रमाणे सुंदर सैंपाक करतात आणि ज्या गौ आदीचे दोहम करण्यात निपुण आहेत. (पुश्‍चय:) कोमलांगी व स्वस्थ अवयव असणाऱ्या त्या मुली (दिव:) दिव्य (अस्य) या गृहाश्रमात असताना (सोमम्‌) उत्तम औषधींच्या रसाच्या साहाय्याने तयार केलेले भोजन (श्रीणन्ति) तयार करू शकतात. (ता:) त्या ब्रह्मचारिणी कन्या (आरोचने) सुंदर आचरण, व्यवहार आणि कर्म करण्यात (त्रिषु) तीन्ही काळात म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य काळात सुखकारिणी असतात. त्याच कन्या (विश:) उत्तम संततीस जन्म देतात ॥55॥
Essence
भावार्थ - जेव्हा उत्तम विद्या-ज्ञान प्राप्त केलेल्या विद्वान युवकांना आपल्याशी अनुकूल वा समान असलेली रुपगुणवती पत्नी मिळते, तेव्हांच गृहाश्रमात सर्वदा सुख नांदते आणि संतानही श्रेष्ठ जन्मते. असे झाल्याशिवाय माणसाला या संसारात सांसारिक सुख आणि शरीरत्यागानंतर मोक्ष कदापि प्राप्त होत नाही ॥55॥
Subject
पुन्हा पुढील मंत्रात त्याचविषयी विधान केले आहे -