Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 54

117 Mantra
12/54
Devata- अग्निर्देवता Rishi- विश्वामित्र ऋषिः Chhand- विराडार्षीनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
लो॒कं पृ॑ण छि॒द्रं पृ॒णाथो॑ सीद ध्रु॒वा त्वम्। इ॒न्द्रा॒ग्नी त्वा॒ बृह॒स्पति॑र॒स्मिन् योना॑वसीषदन्॥५४॥

लो॒कम्। पृ॒ण॒। छि॒द्रम्। पृ॒ण॒। अथो॒ऽइत्यथो॑। सी॒द॒। ध्रु॒वा। त्वम्। इ॒न्द्रा॒ग्नीऽइती॑न्द्रा॒ग्नी। त्वा॒। बृह॒स्पतिः॑। अ॒स्मिन्। योनौ॑। अ॒सी॒ष॒द॒न्। अ॒सी॒ष॒द॒न्नित्य॑सीसदन् ॥५४ ॥

Mantra without Swara
लोकम्पृण ञ्छिद्रं पृणाथो सीद धु्रवा त्वम् । इन्द्राग्नी त्वा बृहस्पतिरस्मिन्योनावसीषदन् ॥

लोकम्। पृण। छिद्रम्। पृण। अथोऽइत्यथो। सीद। ध्रुवा। त्वम्। इन्द्राग्नीऽइतीन्द्राग्नी। त्वा। बृहस्पतिः। अस्मिन्। योनौ। असीषदन्। असीषदन्नित्यसीसदन्॥५४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे कन्ये, (त्वा) तुला (योनौ) बंधन तोडणाऱ्याचे (जन्म-मरणाच्या बंधनातून सुटका करणारे जे साधन-विद्या) त्या (अस्मिन्‌) विद्याप्राप्तीसाठी (इन्द्राग्नी) तुझे माता-पिता आणि (बृहस्पति:) महान वेदवाणीचे जतन करणारी अध्यापिका, या सर्वांना तुला (असीषदन्‌) ती विद्या द्यावी आणि (त्वम्‌) तू या अध्ययनात (ध्रुवा) दृढनिश्‍चयी होऊन (सिद) स्थित रहा (जिद्द व चिकाटीने वेद विद्या शिक) (अथो) त्यानंतर (अध्ययन पूर्ण झाल्यानंतर) या (छिद्रम्‌) छिद्राला (म्हणजे अध्ययन-काळाला) (पण) पूर्ण कर आणि (लोकम्‌) (विद्वान ब्रह्मचारिणी कशी असते, हे पाहण्यासाठी उत्सुक असलेल्याना (पृण) तृप्त व संतुष्ट कर.
Essence
भावार्थ - माता, पिता आणि आचार्य यांनी मुलींना अशाप्रकारची धार्मिक शिक्षा द्यावी की ज्यामुळे त्या मुली चिंताविरहीत होऊन आणि वाईट व्यसनांपासून दूर राहतील. नंतर (आचार्यकुळात वेदाध्ययन पूर्ण झाल्यानंतर) समावर्तन संस्कारानंतर त्या कन्या स्वयंवर विवाह करून पुरुषार्थ करीत पतीसह आनंदीत राहतील. (याकडे माता-पित्यांनी लक्ष पुरवावे) ॥54॥
Subject
पुढील मंत्रातही त्याच विषयीं सांगितले आहे -