Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 53

117 Mantra
12/53
Devata- अग्निर्देवता Rishi- विश्वामित्र ऋषिः Chhand- स्वराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
चिद॑सि॒ तया॑ दे॒वत॑याङ्गिर॒स्वद् ध्रु॒वा सी॑द। परि॒चिद॑सि॒ तया॑ दे॒वत॑याङ्गिर॒स्वद् ध्रु॒वा सी॑द॥५३॥

चित्। अ॒सि॒। तया॑। दे॒वत॑या। अ॒ङ्गि॒र॒स्वत्। ध्रु॒वा। सी॒द॒। प॒रि॒चिदिति॑ परि॒ऽचित्। अ॒सि॒। तया॑। दे॒वत॑या। अ॒ङ्गि॒र॒स्वत्। ध्रु॒वा। सी॒द॒ ॥५३ ॥

Mantra without Swara
चिदसि तया देवतयाङ्गिरस्वद्धरुवा सीद परिचिदसि तया देवतयाङ्गिरस्वद्धरुवा सीद ॥

चित्। असि। तया। देवतया। अङ्गिरस्वत्। ध्रुवा। सीद। परिचिदिति परिऽचित्। असि। तया। देवतया। अङ्गिरस्वत्। ध्रुवा। सीद॥५३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (माता-पिता विद्यारंभ करण्यास पात्र असलेल्या आपल्या मुलीला म्हणतात) मुली वा कन्या , तू (चित्‌) ज्ञानप्राप्तीसाठी प्रदीप्त (उत्सुक आहेस. म्हणून तू (तया) त्या (देवतया) दिव्यागुणांचे दान देणाऱ्या विदुषी स्त्री जवळ (अड्गिरस्वत्‌) प्राणांप्रमाणे प्रिय ज्ञानसाधनेमध्ये प्राणप्रिय मानून) (ध्रुवा) स्थिरपणे (सीऊ) रहा (विदुषी गरुप्राप्ती वा आचार्या याकडे दीर्घकाळ शिक्षण घे). हे ब्रह्मचारिणी, तू आता (परिचित्‌) विविध कला व विद्या प्राप्त करण्यासाठी पात्र झालेली (असि) आहेस तुझे वय शिक्षणप्राप्तीसाठी योग्य झाले आहे) म्हणून तू (तया) त्या (देवतया) धर्मानुष्ठाना-करिल (यज्ञादी कर्माचा रीती जाणण्याकरिता) (अड्गिसस्वत्‌) ज्याप्रमाणे ईश्‍वर सदा एकसमान आहे, तद्वत (ध्रुवा) निश्‍चल वा दत्तचित होऊन (सीद) स्थिर रहा (चिकाटीने विद्याभ्यास करीत रहा ॥53॥
Essence
भावार्थ - सर्व माता, पिता आणि अध्यापिका विदुषी स्त्रियांनी आपापल्या मुलींना योग्यतेनुसार बुद्धिमती करावे. (त्यांना सांगावे की) हे मुलींनो, जर तुम्ही अखंड ब्रह्मचर्याचे सेवन करून संपूर्ण विद्या-ज्ञान प्राप्त करून युवावस्थेत प्रवेश केल्यानंतर (गुण, कर्म, स्वभावाने) जो तुमच्या बरोबरीचा असेल, त्या युवकाशी स्वयंवर विवाह करून गृहाश्रमाचे पालन कराल, तर तुम्ही सर्व सुख प्राप्त करू शकाल आणि उत्तम संततीस जन्म घाला ॥53॥
Subject
मुलीनी काय काय कर्त्तव्य-कर्मे करावीत, याविषयी -