Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 52

117 Mantra
12/52
Devata- अग्निर्देवता Rishi- विश्वामित्र ऋषिः Chhand- निचृदार्ष्यनुस्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒यं ते॒ योनि॑र्ऋ॒त्वियो॒ यतो॑ जा॒तोऽअरो॑चथाः। तं जा॒नन्न॑ग्न॒ऽआ रो॒हाथा॑ नो वर्धया र॒यिम्॥५२॥

अ॒यम्। ते॒। योनिः॑। ऋ॒त्वियः॑। यतः॑। जा॒तः। अरो॑चथाः। तम्। जा॒नन्। अ॒ग्ने॒। आ। रो॒ह॒। अथ॑। नः॒। व॒र्ध॒य॒। र॒यिम् ॥५२ ॥

Mantra without Swara
अयन्ते योनिरृत्वियो यतो जातोऽअरोचथाः । तञ्जानन्नग्नऽआ रोहाथा नो वर्धया रयिम् ॥

अयम्। ते। योनिः। ऋत्वियः। यतः। जातः। अरोचथाः। तम्। जानन्। अग्ने। आ। रोह। अथ। नः। वर्धय। रयिम्॥५२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) अग्निवत्‌ शुद्ध अंत:करण असलेले विद्वान, (ते) आपला (ऋत्विघ:) ऋतुकाळी (योग्यसमयी) केलेला (अयम्‌) हा प्रत्यक्ष (योनि:) दु:खनाशक आणि सुखकारक व्यवहार आहे (योग्यवेळी केलेले योग्य कार्य आहे) (यत:) यापासून (जात:) उत्पन्न झालेले (प्रसिद्ध झालेले) आपण अरोचचा) अशाच प्रकारे सुशोभित होत रहा. (तम्‌) हे (जानन्‌) जाणून घेऊन आपण (आरोह) शुभगुणांवर आरुढ व्हा (अधिक यशस्वी व्हा) (अथ) आणि यानंतर (न:) आम्हा गृहस्थजनांसाठी (रयिम्‌) प्रशंसनीय धनसंपत्तीची (वर्धय) वृद्धी करा ॥52॥
Essence
भावार्थ - हे माता, पिता आणि आचार्य, तुम्ही आपल्या पुत्र-पुत्रींना धर्मानुकूल आचरण करणे आणि ब्रह्मचर्याद्वारे श्रेष्ठ विद्याध्ययन करण्यासाठी उपदेश करा. हे मुलामुलीनों, तुम्ही देखील सत्यविद्या आणि सदाचाराचे पालन करून आमची उचित सेवा करा आणि धनाद्वारे आम्हांस नित्य सुखी ठेवा ॥52॥
Subject
माता,पिता, पुत्र आदींनी एकमेकाशी कसे वागावे वा काय करावे, याविषयी -