Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 51

117 Mantra
12/51
Devata- अग्निर्देवता Rishi- विश्वामित्र ऋषिः Chhand- भुरिगार्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
इडा॑मग्ने पुरु॒दꣳस॑ꣳस॒निं गोः श॑श्वत्त॒मꣳ हव॑मानाय साध। स्यान्नः॑ सू॒नुस्तन॑यो वि॒जावाऽग्ने॒ सा ते॑ सुम॒तिर्भू॑त्व॒स्मे॥५१॥

इडा॑म्। अ॒ग्ने॒। पु॒रु॒दꣳस॒मिति॑ पुरु॒ऽदꣳस॑म्। स॒निम्। गोः। श॒श्व॒त्त॒ममिति॑ शश्वत्ऽत॒मम्। हव॑मानाय। सा॒ध॒। स्यात्। नः॒। सु॒नुः। तन॑यः। वि॒जावेति॑ वि॒जाऽवा॑। अग्ने॑। सा। ते॒। सु॒म॒तिरिति॑ सुऽम॒तिः। भू॒तु॒। अ॒स्मेऽइत्य॒स्मे ॥५१ ॥

Mantra without Swara
इडामग्ने पुरुदँसँ सनिङ्गोः शश्वत्तमँहवमानाय साध । स्यान्नः सूनुस्तनयो विजावाग्ने सा ते सुमतिर्भूत्वस्मे ॥

इडाम्। अग्ने। पुरुदꣳसमिति पुरुऽदꣳसम्। सनिम्। गोः। शश्वत्तममिति शश्वत्ऽतमम्। हवमानाय। साध। स्यात्। नः। सुनुः। तनयः। विजावेति विजाऽवा। अग्ने। सा। ते। सुमतिरिति सुऽमतिः। भूतु। अस्मेऽइत्यस्मे॥५१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (गृहस्थाश्रमाची वचन) हे (अग्ने) विद्वान, (ते) आपली (सा) ती (सुमति:) सद्बद्धी (अस्मे) आम्हा गृहाश्रमी करिता (आमच्या कल्याणाकरिता) (भूतु) असावी. आपला व (न:) आमचा जो (विजावा) विविध ऐश्‍वर्याचा उत्पादक (झुनु:) (संस्कारानंतर) उत्पन्न होणारा (तनय:) पुत्र असेल, आपण (हवामानाय) विद्याग्रहण करीत असणाऱ्यासाठी (इडाम्‌) प्रशंसनीय वाणी शिकवा. (गो:) वाणीसंबंधी सर्व उपयोग आणि (शश्‍वत्तमम्‌) अनादिरुप वेदज्ञान आणि (पुरुदेसम्‌) अनेक कर्म सिद्ध करणारे (सनिम्‌) ऋग्वेद आदी वेद त्या विद्यार्थ्यास (साध) द्यावा शिकवा तसेच (आपल्याप्रमाणे) अध्यापकांनी आणि आम्ही (गृहाश्रमीजनांनी देखील) तसे करावे. (संतानाला वेदशास्त्र शिकवावेत) ॥51॥
Essence
भावार्थ - माता-पिता आणि आचार्य यांचे कर्तव्य आहे की विचारपूर्वक (नियोजन व निश्‍चय करून) रीतीप्रमाणे गर्भधान आदी संस्कार करावेत. त्यामुळे उत्तम संताने उत्पन्न करून त्यांच्या मनात वेद, ईश्‍वर आणि विद्या यांविषयी प्रीती उत्पन्न करावी. संतानाकडून सुखप्राप्तीचा अन्य कोणताही हितकारी उपाय नाही. हे सर्वांनी निश्‍चयाने जाणावे ॥51॥
Subject
गर्भाधानादी पोडश संस्कार आहेत, त्यांचे सर्व नियम पाळून मनुष्यांनी आपल्या संततीवर संस्कार करावेत, याविषयी -