Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 50

117 Mantra
12/50
Devata- अग्निर्देवता Rishi- विश्वामित्र ऋषिः Chhand- आर्ची पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
पु॒री॒ष्यासोऽअ॒ग्नयः॑ प्राव॒णेभिः॑ स॒जोष॑सः। जु॒षन्तां॑ य॒ज्ञम॒द्रुहो॑ऽनमी॒वाऽइषो॑ म॒हीः॥५०॥

पु॒री॒ष्या᳖सः। अ॒ग्नयः॑। प्रा॒व॒णेभिः॑। प्र॒व॒णेभि॒रिति॑ प्रऽव॒णेभिः॑। स॒जोष॑स॒ इति॑ स॒ऽजोष॑सः। जु॒षन्ता॑म्। य॒ज्ञम्। अ॒द्रुहः॑। अ॒न॒मी॒वाः। इषः॑। म॒हीः ॥५० ॥

Mantra without Swara
पुरीष्यासोऽअग्नयः प्रावणेभिः सजोषसः । जुषन्ताँयज्ञमद्रुहो नमीवा इषोऽमहीः ॥

पुरीष्यासः। अग्नयः। प्रावणेभिः। प्रवणेभिरिति प्रऽवणेभिः। सजोषस इति सऽजोषसः। जुषन्ताम्। यज्ञम्। अद्रुहः। अनमीवाः। इषः। महीः॥५०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - सर्व मनुष्यांकरिता उचित आहे की (प्रावणेभि:) विज्ञानामुळे समृद्ध असलेले (अनमीवा) नीरोग शरीर असलेले (अद्रह:) कोणाशी द्रोह न करणारे जे विद्युत आहेत तसेच जे (सजोषरा) सर्वांची सेवा करण्याची वृत्ती असलेले आणि सर्वांवर प्रेम करणारे (पुरीष्यास:) समस्त गुण कार्यादीमध्ये निपुण आणि (अग्नय:) अग्नीप्रमाणे तेजस्वी असलेले (विद्वज्जन आहेत (वा असतात) ते (यज्ञम्‌) विद्या आणि विज्ञानाचे दान रुप यज्ञ करतात, ज्ञानदान करतात व इतरांकडून उत्तम ज्ञान स्वीकारतात ते (मही:) (सर्व लोकांच्या मोठमोठ्या (इष:) इच्छा (जुपन्ताम्‌) पूर्ण करोत (त्यांच्या मार्गावर अनुसरण करून सर्वांनी आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात) ॥50॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे विद्युतशक्ती अनुकूल करून घेतल्यास (योग्य पद्धतीने तिचा उपयोग केल्यास) ती सर्वांना समान रुपाने लाभ देते, त्याप्रमाणे विद्वान लोकांनादेखील नीरोग राहून, द्रोहावी दोषांपासून मुक्त राहून परस्परात प्रीतीभाव ठेवावा आणि ज्ञान-विज्ञानाची वृद्धी रुप यज्ञाचा विस्मर करून सदा निरंतर सुख उपभोगावेत ॥50॥
Subject
मनुष्यांनी द्वेषादी दुष्ट भावनांचा त्याग करून सदा आनंदात रहावे, याविषयी पुढील मंत्रात उपदेश केला आहे -