Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 46

117 Mantra
12/46
Devata- अग्निर्देवता Rishi- सोमाहुतिर्ऋषिः Chhand- भुरिगार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
सं॒ज्ञान॑मसि काम॒ध॑रणं॒ मयि॑ ते काम॒धर॑णं भूयात्। अ॒ग्नेर्भस्मा॑स्य॒ग्नेः पुरी॑षमसि॒ चित॑ स्थ परि॒चित॑ऽऊर्ध्व॒चितः॑ श्रयध्वम्॥४६॥

सं॒ज्ञान॒मिति॑ स॒म्ऽज्ञान॑म्। अ॒सि॒। का॒म॒धर॑ण॒मिति॑ काम॒ऽधर॑णम्। मयि॑। ते॒। का॒म॒धर॑ण॒मिति॑ काम॒ऽधर॑णम्। भू॒या॒त्। अ॒ग्नेः। भस्म॑। अ॒सि॒। अ॒ग्नेः। पुरी॑षम्। अ॒सि॒। चितः॑। स्थ॒। प॒रि॒चित॒ इति॑ परि॒ऽचितः॑। ऊ॒र्ध्व॒चित॒ इत्यू॑र्ध्व॒ऽचितः॑। श्र॒य॒ध्व॒म् ॥४६ ॥

Mantra without Swara
सञ्ज्ञानमसि कामधरणम्मयि ते कामधरणम्भूयात् । अग्नेर्भस्मास्यग्नेः पुरीषमसि चित स्थ परिचितऽऊर्ध्वचितः श्नयध्वम् ॥

संज्ञानमिति सम्ऽज्ञानम्। असि। कामधरणमिति कामऽधरणम्। मयि। ते। कामधरणमिति कामऽधरणम्। भूयात्। अग्नेः। भस्म। असि। अग्नेः। पुरीषम्। असि। चितः। स्थ। परिचित इति परिऽचितः। ऊर्ध्वचित इत्यूर्ध्वऽचितः। श्रयध्वम्॥४६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (जिज्ञासूजन विद्वानास म्हणतात) हे विद्वन्‌ आपण जे (संज्ञानम्‌) संपूर्ण ज्ञान प्राप्त केले (असि) आहे त्या ज्ञानाने आपण (अग्ने:) अग्नीने जाळून (भस्म) केलेल्या (पदार्थांच्या) राखेप्रमाणे दोषांना भस्म करणारे (असि) आहात. आपण ज्या (अग्ने:) विद्युतेच्या (पुरीषम्‌) पूर्ण शक्तीचे ज्ञान प्राप्त केलेले (असि) आहात, ते विज्ञान आणि ती शक्ती मला (जिज्ञासू विद्यार्थी वा अभ्यासकाला) द्या. (ते) आपला (कामधरणम्‌) सर्व संकल्पांचा आधार जे आपले अंत:करण (दृढता व चिकाटी) आहे, त्या स्वरूपाचे अंत:करण (दृढ निश्‍चय) (मयि) माझ्यातही (भूयात्‌) व्हावे. ज्याप्रमाणे तुम्ही विज्ञान-ज्ञानशील लोक विद्या आदी शुभगुणांमुळे (सद्गुणांचे समानत्व असल्यामुळे) (चित:) एकत्र आला आहात. आणि (परिचित:) सर्व शतव्य पदार्थ एकत्र करून (उर्ध्वचित:) (त्या पदार्थांतील) उत्कृष्ट गुणांच्या शोध व संचय करणाऱ्या पुरुषार्थी जनाच्या (पदार्थातील गुण व लाभ जाणून घेण्यासाठी) (श्रमध्वम्‌) जवळ जाता, त्याप्रमाणे आम्ही जिज्ञासूजनांनी देखील जायला हवे. ॥46॥
Essence
भावार्थ - जिज्ञासू लोकांनी विद्येविषयी अधिक जाणण्याची इच्छा करून सदैव विद्वानांजवळ जाऊन प्रश्‍न विचारावेत. (त्यांना म्हणावे की) तुम्हाला पदार्थांविषयी जे जेवढे ज्ञान आहे, ते तुम्ही आम्हाला द्या आणि जी जी हस्तविद्या, शिल्प आदी तुम्हाला येते, ती ती आम्हाला दाखवा (आणि शिकवून शिल्पी बनवा) ॥46॥
Subject
अध्ययन - अध्यापन करणाऱ्यांनी सुखी होण्यासाठी काम करावे, याविषयी -