Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 44

117 Mantra
12/44
Devata- अग्निर्देवता Rishi- सोमाहुतिर्ऋषिः Chhand- स्वराडार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
पुन॑स्त्वादि॒त्या रु॒द्रा वस॑वः॒ समि॑न्धतां॒ पुन॑र्ब्र॒ह्माणो॑ वसुनीथ य॒ज्ञैः। घृ॒तेन॒ त्वं त॒न्वं वर्धयस्व स॒त्याः स॑न्तु॒ यज॑मानस्य॒ कामाः॑॥४४॥

पुन॒रिति॒ पुनः॑। त्वा॒। आ॒दि॒त्याः। रु॒द्राः। वस॑वः। सम्। इ॒न्ध॒ता॒म्। पुनः॑। ब्र॒ह्माणः॑। व॒सु॒नी॒थेति॑ वसुऽनीथ। य॒ज्ञैः। घृ॒तेन॑। त्वम्। त॒न्व᳖म्। व॒र्ध॒य॒स्व॒। स॒त्याः। स॒न्तु। यज॑मानस्य। कामाः॑ ॥४४ ॥

Mantra without Swara
पुनस्त्वादित्या रुद्रा वसवः समिन्धतान्पुनर्ब्रह्माणो वसुनीथ यज्ञैः । घृतेन त्वँतन्वँवर्धयस्व सत्याः सन्तु यजमानस्य कामाः ॥

पुनरिति पुनः। त्वा। आदित्याः। रुद्राः। वसवः। सम्। इन्धताम्। पुनः। ब्रह्माणः। वसुनीथेति वसुऽनीथ। यज्ञैः। घृतेन। त्वम्। तन्वम्। वर्धयस्व। सत्याः। सन्तुः। यजमानस्य। कामाः॥४४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (वसुनीय) वेदादी शास्त्रांचे ज्ञान आणि सुवर्ण आदी धन प्राप्त करून देणारे आपण (यज्ञै:) अध्ययन, अध्यापन क्रिया, आचरण आदी यज्ञाने आणि (घृतेन) शुद्ध संस्कारित घृत आदी पौष्टिक पदार्थ आणि जल यांद्वारे (तन्वम्‌) आपल्या शरीराला (नित्य) वर्धस्व वाढवा (पुष्ट व नीरोग करा) (पुन:) अध्ययन - अध्यापन संपल्यानंतर (त्वा) आपणाला (आदित्या:) पूर्ण विद्या व शक्तीने संपन्न अशा (रुद्रा:) मध्यास्थ विद्वान (समाजातील मध्यम कोठीचे विद्वान) आणि (वसव:) प्रथम (वा उच्च कोटीचे अनुभवी) विद्वान तसेच (ब्रह्माण:) चार वेदांचे अध्ययन करून ब्रह्मा पदवी प्राप्त केलेले श्रेष्ठ विद्वान आपणाला (समिन्धताम्‌) सम्यकरीत्या प्रकाशित वा अधिक विद्यावान करोत (यज्ञ, पुष्ट शरीर गुरुकुलातील अध्ययन संपल्यानंतर समाजातील साधारण, मध्यम आणि उच्च कोटीच्या विद्वानांनी सत्संगाने तुम्ही अधिक अनुभवसंपन्न व मानी व्हावे) याप्रकारे अनुष्ठान करून (यजमानस्य) यज्ञ, सत्संग आणि विद्वानांचा सत्कार करणाऱ्या मनुष्याच्या (कामा:) कामना (सत्या:) सत्य (सन्तु) व्हाव्यात. (मी याज्ञिक पुरोहित यजमानाविषयी अशी कामना व्यक्त करतो) ॥44॥
Essence
भावार्थ - जी माणसें प्रयत्नपूर्वक सर्व विद्या अवगत करून आणि इतरांना देऊन वारंवार सज्जन-संगतीत राहतात, तसेच कुपथ्य आणि विषय-वासनांचा त्याग करून देह आणि आत्म्याचे रोग, दोष दूर करून नित्य पुरुषार्थ करतात, त्यांचेच संकल्प पूर्ण होतात (इतरांचे नव्हे) ॥44॥
Subject
कोणत्या प्रकारच्या लोकांच्या मनातील संकल्प सिद्धीस जातात, याविषयी -