Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 39

117 Mantra
12/39
Devata- अग्निर्देवता Rishi- विरूप ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
पुन॑रा॒सद्य॒ सद॑नम॒पश्च॑ पृथि॒वीम॑ग्ने। शेषे॑ मा॒तुर्यथो॒पस्थे॒ऽन्तर॑स्या शि॒वत॑मः॥३९॥

पुनः॑। आ॒सद्येत्या॒ऽसद्य॑। सद॑नम्। अ॒पः। च॒। पृ॒थि॒वीम्। अ॒ग्ने॒। शेषे॑। मा॒तुः। यथा॑। उ॒पस्थ॒ इत्यु॒पऽस्थे॑। अ॒न्तः। अ॒स्या॒म्। शि॒वत॑म॒ इति॑ शि॒वऽत॑मः ॥३९ ॥

Mantra without Swara
पुनरासद्य सदनमपश्च पृथिवीमग्ने । शेषे मातुर्यथोपस्थे न्तरस्याँ शिवतमः ॥

पुनः। आसद्येत्याऽसद्य। सदनम्। अपः। च। पृथिवीम्। अग्ने। शेषे। मातुः। यथा। उपस्थ इत्युपऽस्थे। अन्तः। अस्याम्। शिवतम इति शिवऽतमः॥३९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) इच्छा आदी गुणांनी युक्त हे विद्वान मनुष्य तू (अप:ऽ) जलात (पृथिवीम्‌) पृथ्वी- वरील पदार्थात (च) आणि (सदनं) गर्भाला (पुन:) पुन्हा-पुन्हावा वारंवार (आसद्य) प्राप्त होऊन (अस्थाम्‌) या मातेच्या (अन्त:) गर्भाशयात (शिमतम:) मंगलकारी होऊन (वा होण्यासाठी पुन:पुन: येशील, हे जाणून घे) आणि (यथा) ज्याप्रमाणे एक बालक (मातृ:) आर्सच्या (उपस्थे) मांडीवर (शेषे) झोपतो. त्याप्रमाणे तू मातेची सेवा करण्यासाठी मंगलकारी होऊन (पुन्हा गर्भात येशील, हे जाणून घे) ॥39॥
Essence
भावार्थ - पुत्रांचे कर्तव्य आहे की ज्याप्रमाणे माता आपल्या मुलाला सुखी व आनंदी करते, तसे पुत्रांनी आपल्या प्रेमपूर्ण सेवेद्वारे मातेलाही सुखी व प्रसन्न ठेवावे. आणि कदापि आई-वडिलांचा विरोध करूं नये. तसेच माता-पित्यांनाही आवश्‍यक आहे की त्यांनी आपल्या मुलांना अधर्म आणि कुशिक्षा कदापि शिकवूं नये ॥39॥
Subject
यानंतर, माता, पिता आणि पुत्र, या सर्वांना एकमेकाशी कसे वागावे, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -
Footnote
(टीप : या मंत्राच्या हिंदी भाष्यात ‘ताप:’ ‘पृथिवीम्‌’ ‘चे’ ‘सदन’ चार शब्दांना अधोरेखीत केला आहे)