Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 38

117 Mantra
12/38
Devata- अग्निर्देवता Rishi- विरूप ऋषिः Chhand- निचृदार्ष्यनुस्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
प्र॒सद्य॒ भस्म॑ना॒ योनि॑म॒पश्च॑ पृथि॒वीम॑ग्ने। स॒ꣳसृज्य॑ मा॒तृभि॒ष्ट्वं ज्योति॑ष्मा॒न् पुन॒रास॑दः॥३८॥

प्र॒सद्येति॑ प्र॒ऽसद्य॑। भस्म॑ना। योनि॑म्। अ॒पः। च॒। पृ॒थि॒वीम्। अ॒ग्ने॒। सं॒ऽसृज्येति॑ स॒म्ऽसृज्य॑। मा॒तृभि॒रिति॑ मा॒तृऽभिः॑। त्वम्। ज्योति॑ष्मान्। पुनः॑। आ। अ॒स॒दः॒ ॥३८ ॥

Mantra without Swara
प्रसद्य भस्मना योनिमपश्च पृथिवीमग्ने । सँसृज्य मातृभिष्ट्वञ्ज्योतिष्मान्पुनरासदः ॥

प्रसद्येति प्रऽसद्य। भस्मना। योनिम्। अपः। च। पृथिवीम्। अग्ने। संऽसृज्येति सम्ऽसृज्य। मातृभिरिति मातृऽभिः। त्वम्। ज्योतिष्मान्। पुनः। आ। असदः॥३८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) प्रकाशमान पुरुष, (ज्योतिष्यान्‌) सूर्याप्रमाणे ज्योतिर्मय असलेल्या हे (शरीरधारी) पुरुषा, तू (भस्मना) मृत शरीर भस्म झाल्यानंतर (जीवात्मा या रुपात) पृथिवीम्‌) पृथ्वी (प) अग्नी आदीत आणि (अप:) पाण्यामध्ये राहून (योनिम्‌) देह धारणाचे कारणाला (प्रसघ) प्राप्त हो (कर्मानुसार शरीर धारण करण्याची स्थिति आल्यानंतर देह प्राप्त कर) (तू लक्षांत असू दे की) (मातृभि:) मातांच्या (अनेक जन्मी मातेच्या उदरी वास करून (पुन:) तू पुन्हा वा वारंवार (आसद:) शरीर धारण करतोस ॥38॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. विद्वान म्हणतात) हे प्राण्यानों, तुम्ही जेव्हा हे शरीर सोडाल, त्याचे भस्म होऊन ते शरीर पंच महाभूतांमध्ये मिसळून जाईल. तुम्ही आत्म्यासह पुन्हा मातेच्या गर्भात जाऊन पुन्हा शरीर धारण करता, (हे नीट जाणून घ्या. आपले वास्तविक रुप ओळखा) ॥38॥
Subject
मृत्यूनंतर शरीराविषयी काय करावे, याविषयी -