Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 35

117 Mantra
12/35
Devata- आपो देवताः Rishi- वसिष्ठ ऋषिः Chhand- आर्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
आपो॑ देवीः॒ प्रति॑गृभ्णीत॒ भस्मै॒तत् स्यो॒ने कृ॑णुध्वꣳ सुर॒भाऽउ॑ लो॒के। तस्मै॑ नमन्तां॒ जन॑यः सु॒पत्नी॑र्मा॒तेव॑ पु॒त्रं बि॑भृता॒प्स्वेनत्॥३५॥

आपः॑। दे॒वीः॒। प्रति॑। गृ॒भ्णी॒त॒। भस्म॑। ए॒तत्। स्यो॒ने। कृ॒णु॒ध्व॒म्। सु॒र॒भौ। ऊँ॒ इत्यूँ॑। लो॒के। तस्मै॑। न॒म॒न्ता॒म्। जन॑यः। सु॒पत्नी॒रिति॑ सु॒ऽपत्नीः॑। मा॒तेवेति॑ मा॒ताऽइ॑व। पु॒त्रम्। बि॒भृ॒त॒। अ॒प्स्वित्य॒प्ऽसु। ए॒न॒त् ॥३५ ॥

Mantra without Swara
आपो देवीः प्रति गृभ्णीत भस्मैतत्स्योने कृणुध्वँसुरभा लोके । तस्मै नमन्ताञ्जनयः सुपत्नीर्मातेव पुत्रम्बिभृताप्स्वेनत् ॥

आपः। देवीः। प्रति। गृभ्णीत। भस्म। एतत्। स्योने। कृणुध्वम्। सुरभौ। ऊँ इत्यूँ। लोके। तस्मै। नमन्ताम्। जनयः। सुपत्नीरिति सुऽपत्नीः। मातेवेति माताऽइव। पुत्रम्। बिभृत। अप्स्वित्यप्ऽसु। एनत्॥३५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वज्जनहो, ज्या (कुमारिका) कन्या (आप:) पवित्र जलाप्रमाणे पवित्र आणि समस्त शुभगुणविद्यादीमध्ये गती असलेल्या आणि (देवी:) सुंदर रुप-स्वभाव असलेल्या आहेत, ज्या (सुरभौ) ऐश्‍वर्यवती आणि (लोके) दर्शनीय आहेत, त्या कन्या आपल्यासाठी अनुकूल पती निवडतील, त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे (प्रतिगृभ्णीत) स्वीकार करू द्यावा. (त्या पतीने त्यांचा स्वीकार करावा) आणि त्या कन्यांना सुखी (कृणुध्वम्‌) करा. तसेच (एतत्‌) हे जे (भस्म) (त्या युवकांचे) प्रकाशक तेज आहेत (तस्मै) त्याच्यासाठी जी (सुपत्नी:) रुपवती (जनय:) विद्याविभूषित सुशिक्षित स्त्रिया नम्र होतात, (त्या अनुकूल युवकाची निवड करतात) त्यांच्याकरिता तुम्ही लोक देखील (नमन्ताम्‌) नम्र व्हा (समाजातील वरिष्ठजनांनी त्या तरूण-तरूणीला परवानगी द्यावी) (उ ) आणि हे स्त्री व हे पुरुष, ज्याप्रमाणे (पुत्रम्‌) पुत्राला (मातेव) त्याची माता (प्रेम करते) तद्वत तुम्ही दोघांनी (अप्सु) आपल्या प्राणांमध्ये (एनत्‌) संततीचे (विण्मृत्‌) धारण करा (उत्तम संतानास जन्म द्या) ॥35॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. मनुष्यांसाठी उचित आहे की त्यांनी एकमेकाविषयी प्रेम व प्रसन्नभाव असल्यास स्वयंवर विवाह धर्माप्रमाणे विवाह करावा आणि पुत्रादी उत्पन्न करून त्यांना विद्यावान करून गृहाश्रमाच्या ऐश्‍वर्याची उन्नती करावी ॥35॥
Subject
सर्व मनुष्यांनी स्वयंवर पद्धतीने विवाह करावा, याविषयी -