Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 30

117 Mantra
12/30
Devata- अग्निर्देवता Rishi- विरूपाक्ष ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
स॒मिधा॒ग्निं दु॑वस्यत घृ॒तैर्बो॑धय॒ताति॑थिम्। आस्मि॑न् ह॒व्या जु॑होतन॥३०॥

स॒मिधेति॑ स॒म्ऽइधा॑। अ॒ग्निम्। दु॒व॒स्य॒त॒। घृ॒तैः। बो॒ध॒य॒त॒। अति॑थिम्। आ। अ॒स्मि॒न्। ह॒व्या। जु॒हो॒त॒न॒ ॥३० ॥

Mantra without Swara
समिधाग्निन्दुवस्यत घृतैर्बोधयतातिथिम् । आस्मिन्हव्या जुहोतन् ॥

समिधेति सम्ऽइधा। अग्निम्। दुवस्यत। घृतैः। बोधयत। अतिथिम्। आ। अस्मिन्। हव्या। जुहोतन॥३०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे गृहस्थजनहो, जसे (समिधा) चांगल्याप्रकारच्या समिधांनी (वा ज्व हनशी घृत आदी पदार्थांद्वारे) (अग्निम्‌) अग्नी प्रज्वलित करतात, त्याप्रमाणे उपदेश देणाऱ्या विद्वानाची तुम्ही (दुवस्थत) सेवा करा, आणि ज्याप्रमाणे सुसंस्कृत अन्न (घृतै:) घृत आदी पदार्थ अग्निमध्ये होम केल्याने जगावर उपकार होतो, त्याप्रमाणे (अतिथिम्‌) ज्याच्या येण्या-जाण्याची निश्‍चित अशी तिथी नाही (म्हणजे विद्वान उपदेशक केव्हाही गृहस्थाच्या घरी अचानकपणे येतो) त्या उपदेशकाचे सहर्ष स्वागत करून त्याच्या यथोचित सत्कार करावा आणि (अस्मिन्‌) या जगात (हव्या) दानास योग्य अशा वस्तू (आजु होतात) चांगल्या रीतीने (आदराने व प्रसन्नतेने) भेट द्या ॥30॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी केवळ सत्पुरषींचीच सेवा करावी आणि संपत्तीच दान द्यावे. ज्याप्रमाणे यज्ञिकजन घृत आदी पदार्थांचा अग्नीत होम करून जगावर उपकार करतात, त्याप्रमाणे विद्वानांना उत्तम पदार्थांचे दान करून जगात विद्या व सुशिक्षेची वृद्धी करावी आणि साऱ्या संसाराला सुखी करावे ॥30॥
Subject
मनुष्यांनी कोणाची सेवा करावी अथवा कोणाची संगतीत रहावे, याविषयी -