Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 25

117 Mantra
12/25
Devata- अग्निर्देवता Rishi- वत्सप्रीर्ऋषिः Chhand- भुरिक्पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
दृ॒शा॒नो रु॒क्मऽउ॒र्व्या व्य॑द्यौद् दु॒र्मर्ष॒मायुः॑ श्रि॒ये रु॑चा॒नः। अ॒ग्निर॒मृतो॑ऽअभव॒द् वयो॑भि॒र्यदे॑नं॒ द्यौरज॑नयत् सु॒रेताः॑॥२५॥

दृ॒शा॒नः। रु॒क्मः। उ॒र्व्या। वि। अ॒द्यौ॒त्। दु॒र्मर्ष॒मिति॑ दुः॒ऽमर्ष॑म्। आयुः॑। श्रि॒ये। रु॒चा॒नः। अ॒ग्निः। अ॒मृतः॑। अ॒भ॒व॒त्। वयो॑भि॒रिति॒ वयः॑ऽभिः। यत्। ए॒न॒म्। द्यौः। अज॑नयत्। सु॒रेता॒ इति॑ सु॒ऽरेताः॑ ॥२५ ॥

Mantra without Swara
दृशानो रुक्म उर्व्या व्यद्यौद्दुर्मर्षमायुः श्रिये रुचानः । अग्निरमृतोऽअभवद्वयोभिर्यदेनन्द्यौर्जनयत्सुरेताः ॥

दृशानः। रुक्मः। उर्व्या। वि। अद्यौत्। दुर्मर्षमिति दुःऽमर्षम्। आयुः। श्रिये। रुचानः। अग्निः। अमृतः। अभवत्। वयोभिरिति वयःऽभिः। यत्। एनम्। द्यौः। अजनयत्। सुरेता इति सुऽरेताः॥२५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ हे मनुष्यांनो, (यत्‌) नो (दृशान:) सर्व पाहण्याची शक्ती देणारा आहे, (रुक्म:) प्रिय वा ज्याच्याविषयी प्रेम वाटावे, असा आहे, जो (श्रिये) सृष्टीतील सौन्दर्याचा प्रकाशक आणि (दुर्मर्षम्‌) दु:खरहित आहे, जो (आयु:) मनुष्यांना जीवन पद्रान करीत त्यांना (अमृत:) नाशरहित वा दीर्घायु करीत (उर्व्या) या पृथ्वीवर (व्यद्यौत्‌) प्रकाशित होतो, (तो अग्नी) (वयोभि:) आपल्या व्यापकत्व गुणांमुळे (अभवत्‌) कुठेही उत्पन्न होतो. परमेश्‍वर (द्यौ:) सर्वप्रकाशक असून (सुरे ता:) सुंदर शोभ व पराक्रम करणारा आहे, (यत्‌) तो ज्याच्या करिता (मनुष्यांकरिता) (एनम्‌) या अग्नीला (अजनयत्‌) उत्पन्न करतो, ते मनुष्यगण तुम्ही त्या परमेश्‍वराला, जीवनाला आणि विद्युत रुप अग्नीला जाणा (जीवनाचे व विद्युदग्नीचे महत्त्व ओळखा) ॥25॥
Essence
भावार्थ - जे मनुष्य सर्व जगाची उत्पत्ती करणाऱ्या परमेश्‍वराला त्याच्या गुण, कर्म व स्वभावाने, खऱ्या रुपाने जाणतात, त्यास जगाचे कारण मानतात, त्याची उपासना करतात, आणि ईश्‍वर उपासनेने होणारे लाभ प्राप्त करतात, ते चिरंजीवी होऊन धन-संपदेचे स्वामी होतात ॥25॥
Subject
मनुष्यांनी आणखी काय काय जाणले पाहिजे -