Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 24

117 Mantra
12/24
Devata- अग्निर्देवता Rishi- वत्सप्रीर्ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
उ॒शिक् पा॑व॒को अ॑र॒तिः सु॑मे॒धा मर्त्ये॑ष्व॒ग्निर॒मृतो॒ नि धा॑यि। इय॑र्त्ति धू॒मम॑रु॒षं भरि॑भ्र॒दुच्छु॒क्रेण॑ शो॒चिषा॒ द्यामिन॑क्षन्॥२४॥

उ॒शिक्। पा॒व॒कः। अ॒र॒तिः। सु॒मे॒धाः इति॑ सुऽमे॒धाः। मर्त्ये॑षु। अ॒ग्निः। अ॒मृतः॑। नि। धा॒यि॒। इय॑र्त्ति। धू॒मम्। अ॒रु॒षम्। भरि॑भ्रत्। उत्। शु॒क्रेण॑। शो॒चिषा॑। द्याम्। इन॑क्षन् ॥२४ ॥

Mantra without Swara
उशिक्पावकोऽअरतिः सुमेधा मर्त्येष्वग्निरमृतो निधायि । इयर्ति धूममरुषम्भरिभ्रदुच्छुक्रेण शोचिषा द्यामिनक्षन् ॥

उशिक्। पावकः। अरतिः। सुमेधाः इति सुऽमेधाः। मर्त्येषु। अग्निः। अमृतः। नि। धायि। इयर्त्ति। धूमम्। अरुषम्। भरिभ्रत्। उत्। शुक्रेण। शोचिषा। द्याम्। इनक्षन्॥२४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ईश्‍वराने (मर्त्येषु) मनुष्यांमध्ये (उशिक्‌) माननीय आणि (पावक:) पवित्र करणारे तसेच (अरति:) ज्ञानमय (सुमेधा:) उत्तम बुद्धीद्वारे ग्राह्य वा ग्रहणीय, तसेच (अमृत:) मरणधर्मरहित अविनाशी (अग्नि:) आका ज्ञान (निधायि) स्थापित केले आहे (परमेश्‍वराने मानवांना जे ज्ञानरुप जे पवित्र साधन दिले आहे) आणि जो ज्ञानाग्नी (शुक्रेण) शीघ्रकारी (शोचिषा) प्रकाशाद्वारे (घाम्‌) सूर्यलोकात (इनक्षमन्‌) व्याप्त होत होत (धूमन्‌) धुराचे (अरुषम्‌) रुप (भरिभ्रत्‌) धारण करीत (उदियर्ति) मनुष्यांना प्राप्त होतो (ज्ञानत्वरित गतिशील असून ते सूर्य, अंतरिक्ष आदीपर्यंत जाते, तसेच पृथ्वीवरील पदार्थांची जाणीव मनुष्यांना देते. धूर हे अग्नीचे लक्षण आहे - जेथे धूर तेथे अग्नी अवश्‍य आहे वा असायला पाहिजे. तद्वत रुपधारी पदार्थांच्या ज्ञानाच्या रुपाने अमूर्त ज्ञानाचे म्हणजे ज्ञानशक्तीचे अस्तित्व जाणवते) हे मनुष्यांनो तुम्ही अशा अग्नीचा जो निर्माता परमेश्‍वर त्याची उपासना करा अथवा त्या ज्ञानाग्नीपासून यथोचित लाभ घ्या ॥24॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी जाणावे की ईश्‍वर सर्व सृष्टीचे कारण असून जगत व त्यातील पदार्थ कार्य आहेत. हे जाणून त्यांनी सर्व पदार्थांचे (विशेष अध्ययन, अभ्यास, निरीक्षण, शोध आदीद्वारे) करून आपली बुद्धी विकसित करावी ॥24॥
Subject
मनुष्यांनी काय करावे, याविषयी पुढील मंत्रात उपदेश केला आहे -