Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 22

117 Mantra
12/22
Devata- अग्निर्देवता Rishi- वत्सप्रीर्ऋषिः Chhand- निचृदार्षी त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
श्री॒णामु॑दा॒रो ध॒रुणो॑ रयी॒णां म॑नी॒षाणां॒ प्रार्प॑णः॒ सोम॑गोपाः। वसुः॑ सू॒नुः सह॑सोऽअ॒प्सु राजा॒ विभा॒त्यग्र॑ऽउ॒षसा॑मिधा॒नः॥२२॥

श्री॒णाम्। उ॒दा॒र इत्यु॑त्ऽआ॒रः। ध॒रुणः॑। र॒यी॒णाम्। म॒नी॒षाणा॑म्। प्रार्प॑ण॒ इति॑ प्र॒ऽअर्प॑णः। सोम॑गोपा॒ इति॒ सोम॑ऽगोपाः। वसुः॑। सु॒नुः। सह॑सः। अ॒प्स्वित्य॒प्ऽसु। राजा॑। वि। भा॒ति॒। अग्रे॑। उ॒षसा॑म्। इ॒धा॒नः ॥२२ ॥

Mantra without Swara
श्रीणामुदारो धरुणो रयीणाम्मनीषाणाम्प्रार्पणः सोमगोपाः । वसुः सूनुः सहसो अप्सु राजा विभात्यग्रऽउषसामिधानः ॥

श्रीणाम्। उदार इत्युत्ऽआरः। धरुणः। रयीणाम्। मनीषाणाम्। प्रार्पण इति प्रऽअर्पणः। सोमगोपा इति सोमऽगोपाः। वसुः। सुनुः। सहसः। अप्स्वित्यप्ऽसु। राजा। वि। भाति। अग्रे। उषसाम्। इधानः॥२२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (परमेश्‍वराचा आदेश) हे मनुष्यांनो, जो पुरुष (उपसाम्‌) प्रभातेच्या (अग्रे) आरंभीच्या काळातील (इधान:) सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे (सकाळचा सूर्य दाहक नसतो त्याचे तेज सुग्रहच व दर्शनीय असते) जो (श्रीणाम्‌) उत्तम संपदा अर्जित करून (उदार:) पदार्थ दान करणारा आहे, जो (रयीणाम्‌) धनाचे (धरूण:) धारण करणारा (संपत्तीशाली) आणि (मनीषाणाय्‌) बुद्धीची (प्रार्मण:) प्राप्ती करून देणारा (विद्येची वृद्धीविस्तार करणारा) आहे, तसेच जो (सोमगोपा:) औषधीचा आणि ऐश्‍वर्याचा रक्षक आहे, जो (सहस:) ब्रह्मचर्य धारण करणारा जितेंद्रिय आणि बलवान पित्याचा (सूनु:) पुत्र आहे व जो (वसु:) ब्रह्मचर्याश्रमात राहिल्यामुळे (अप्सु) प्राणांमध्ये (राजा) प्रकाशमान होऊन (विभाति) शुभ गुणांचा प्रकाश प्रसारित करतो, त्या पुरुषाला तुम्ही सर्वांच्या अध्यक्षस्थानी नेमा (त्याला सभापती व राष्ट्राध्यक्ष करा) ॥22॥
Essence
भावार्थ - मनुष्यांकरिता हेच उचित आहे की त्यांनी अशा मनुष्याला राज्ञपदी नेमावे वा निवडावे की जो सुपात्रीं दान देणारा, धनाचा अपव्यय न करणारा आणि सर्वांना विद्या-बुद्धी देणारा आहे. तसेच ज्याने ब्रह्मचर्याश्रम सेवन केले आहे, जो जितेंद्रिय आहे, ज्याने योगाच्या यम आदी आठ अंगांचे पालन-साधन केले आहे, जो प्रकाशमान सूर्याप्रमाणे उत्तम गुण, कर्म व स्वभावाने सुशोभित आहे, जो आपल्या पित्याप्रमाणेच प्रजापालक आहे, अशा मनुष्यास तुम्ही प्रजाजनांनी राज्यकर्ता सभापतीपदी बसवावे ॥22॥
Subject
आता राज्यकार्यासाठी कशा प्रकारच्या मनुष्यास राजा म्हणून नेमावे वा निवडावे, हे पुढील मंत्रात सांगितले आहे -