Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 16

117 Mantra
12/16
Devata- अग्निर्देवता Rishi- त्रित ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
अ॒न्तर॑ग्ने रु॒चा त्वमु॒खायाः॒ सद॑ने॒ स्वे। तस्या॒स्त्वꣳ हर॑सा॒ तप॒ञ्जात॑वेदः शि॒वो भ॑व॥१६॥

अ॒न्तः। अ॒ग्ने॒। रु॒चा। त्वम्। उ॒खायाः॑। सद॑ने। स्वे। तस्याः॑। त्वम्। हर॑सा। तप॑न्। जात॑वेद॒ इति॑ जात॑ऽवेदः। शि॒वः। भ॒व॒ ॥१६ ॥

Mantra without Swara
अन्तरग्ने रुचा त्वमुखायाः सदने स्वे । तस्यास्त्वँ हरसा तपञ्जातवेदः शिवो भव ॥

अन्तः। अग्ने। रुचा। त्वम्। उखायाः। सदने। स्वे। तस्याः। त्वम्। हरसा। तपन्। जातवेद इति जातऽवेदः। शिवः। भव॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (प्रजाजनांनी उत्त्की) हे (जातवेद:) वेदज्ञाता (अग्ने) तेजस्वी विद्वान (सभापती राजा), आपण (उखाया:) प्राप्त प्रजेसाठी, अग्नी जसा पात्राला खालून उष्णता देतो, तसे आपण उत्साह द्या. (स्वे) आपल्या (सदने) भवनात अथवा आपल्या अध्ययन-स्थानात बसून एकीकडे (तपन्‌) शत्रूंना आपल्या प्रभावाने भयभीत करता. (रणनीती वा कार्यपद्धतीने शत्रूला त्रस्त, पराभूत करता.) तर दुसरीकडे (अन्त:) प्रजेमध्ये या प्रजेशी (रुचा) प्रेमाने वागता. तसेच (तस्या:) या प्रजेच्या (हरसा) प्रज्वलित तेजाद्वारे (संयुक्त लोकशक्तीद्वारे) आपण दूर लोटत प्रजेविषयी सदा (शिव:) मंगलकारी (भव) व्हा. ॥16॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे जसे सभाध्यक्ष राजासाठी आवश्‍यक आहे की त्याने न्यायासमावर बसून अत्यंत आत्मीयतेने राज्यपालन रूप कर्तर्व्ये पूर्ण करावीत, तसेच प्रजेसाठी देखील हे उचित आहे की तिने राजाला नेहमी सुख द्यावे आणि राज्यातील (वा समाजातील दुष्टांना ताडन करावे ॥16॥
Subject
यापुढील मंत्रात राजाच्या कर्तव्यांविषयी सांगितले आहे -