Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 14

117 Mantra
12/14
Devata- जीवेश्वरौ देवते Rishi- त्रित ऋषिः Chhand- भुरिग् जगती Swara- निषादः
Mantra with Swara
ह॒ꣳसः शु॑चि॒षद् वसु॑रन्तरिक्ष॒सद्धोता॑ वेदि॒षदति॑थिर्दुरोण॒सत्। नृ॒ष॑द् व॑र॒सदृ॑त॒सद् व्यो॑म॒सद॒ब्जा गो॒जाऽऋ॑त॒जाऽअ॑द्रि॒जाऽऋ॒तं बृ॒हत्॥१४॥

ह॒ꣳसः। शु॒चि॒षत्। शु॒चि॒सदिति॑ शुचि॒ऽसत्। वसुः॑। अ॒न्त॒रि॒क्ष॒सदित्य॑न्तरिक्ष॒ऽसत्। होता॑। वे॒दि॒षत्। वे॒दि॒सदिति॑ वेदि॒ऽसत्। अति॑थिः। दु॒रो॒ण॒सदिति॑ दुरोण॒ऽसत्। नृ॒षत्। नृ॒सदिति॑ नृ॒ऽसत्। व॒र॒सदिति॑ वर॒ऽसत्। ऋ॒त॒सदित्यृ॑त॒ऽसत्। व्यो॒म॒सदिति॑ व्योम॒ऽसत्। अ॒ब्जा इत्य॒प्ऽजाः। गो॒जा इति॑ गो॒ऽजाः। ऋ॒त॒जा इत्यृ॑त॒ऽजाः। अ॒द्रि॒जा इत्य॑द्रि॒ऽजाः। ऋ॒तम्। बृ॒हत् ॥१४ ॥

Mantra without Swara
हँसः शुचिषद्वसुरन्तरिक्षसद्धोता वेदिषदतिथिर्दूरोणसत् । नृषद्वरसदृतसद्व्योमसदब्जा गोजाऽऋतजा अद्रिजा ऋतम्बृहत् ॥

हꣳसः। शुचिषत्। शुचिसदिति शुचिऽसत्। वसुः। अन्तरिक्षसदित्यन्तरिक्षऽसत्। होता। वेदिषत्। वेदिसदिति वेदिऽसत्। अतिथिः। दुरोणसदिति दुरोणऽसत्। नृषत्। नृसदिति नृऽसत्। वरसदिति वरऽसत्। ऋतसदित्यृतऽसत्। व्योमसदिति व्योमऽसत्। अब्जा इत्यप्ऽजाः। गोजा इति गोऽजाः। ऋतजा इत्यृतऽजाः। अद्रिजा इत्यद्रिऽजाः। ऋतम्। बृहत्॥१४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे प्रजाजन हो, तुम्ही (अशा सद्गुणयुक्त पुरुषास सभापती राजा करा की जो) (हंस:) दुष्कर्मनाशक आहे (सुचिसत्‌) पवित्त आचरण करणारा वा सदाचारी आहे आणि (वसु:) सज्जनांच्या सत्संगात राहणारा अथवा त्यांना वसविण्यास (त्यांच्याकरिता योग्य निवासस्थानाची व्यवस्था करणारा) आहे. जो (अन्तरिक्षसत्‌) धर्माच्या मर्यादेत वागणारा असून (होता) सत्याचे ग्रहण करणारा व करविणारा आहे, जो (वेदिषत्‌) सर्व भूमीवर लक्ष ठेवणारा अथवा यज्ञवेदीवर यज्ञिक म्हणून उपस्थित असतो, जो (अतिथि:) अतिथिसम पूजनीय आहे अथवा जो राज्यरक्षण व पालनासाठी राज्यात सर्वत्र भ्रमण करणारा आहे, (दुरोणसत्‌) सर्व ऋतूंमध्ये प्रजेसाठी सुखदायक प्रबन्ध करतो अथवा जो अशा सुखद भवनात निवास करतो, जो (नृषत्‌) सैनिकांमध्ये रमणारा अथवा सेनानायकांचा अधिष्ठाता आहे (वरसत्‌) विद्वानांच्या आज्ञेप्रमाणे वागणारा असून (ऋतसत्‌) सत्याचरणासाठी कृतप्रतिज्ञ आहे, जो (व्योमसत्‌) व्यापक ईश्‍वराच्या वा जीवात्माविषयी जागरूक असून आकाशाप्रमाणे विशालहृदय आहे, जो (अब्जा:) प्राणांना प्रेरणा देणारा आणि (गोजा:) इंद्रियांचे दमन व पशूंची वृद्धी करणारा आहे, जो (ऋतजा:) सत्य विज्ञानाचा शोध करणारा व (अद्रिजा:) वृष्टी करविणाऱ्या शास्त्रांचा ज्ञाता विद्वान आहे आणि जो (ऋतम्‌) सत्य तसेच (बृहत्‌) अनंत ईश्‍वर आणि जिवात्माचे ज्ञान मिळविण्यास उद्युक्त आहे, अशा पुरुषालाच हे प्रजाजनहो, तुम्ही सभाध्यक्ष राजा करा (राज्यासाठी योग्य राजाची निवड करताना वरील कसोट्या लावा) ॥14॥
Essence
भावार्थ - ईश्‍वर जसा सर्वांचे कल्याण करणारा व सुखदायक आहे, तद्वत जो मनुष्य प्रजेचे पालन करीत सर्व प्रजेस सुखी ठेवतो, वा सुखी करण्यास समर्थ आहे, तोच राजा होण्यास योग्य आहे. असा राजा असेल, तरच प्रजा सुखी राहू शकते ॥14॥
Subject
पुढील मंत्रात परमात्मा आणि जीवात्मा या विषयी वर्णन केले आहे -