Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 13

117 Mantra
12/13
Devata- अग्निर्देवता Rishi- त्रित ऋषिः Chhand- भुरिगार्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
अग्रे॑ बृ॒हन्नु॒षसा॑मू॒र्ध्वोऽअ॑स्थान्निर्जग॒न्वान् तम॑सो॒ ज्योति॒षागा॑त्। अ॒ग्निर्भा॒नुना॒ रुश॑ता॒ स्वङ्ग॒ऽआ जा॒तो विश्वा॒ सद्मा॑न्यप्राः॥१३॥

अग्रे॑। बृ॒हन्। उ॒षसा॑म्। ऊ॒र्ध्वः। अ॒स्था॒त्। नि॒र्ज॒ग॒न्वानिति॑ निःऽजग॒न्वान्। तम॑सः। ज्योति॑षा। आ। अ॒गा॒त्। अ॒ग्निः। भा॒नुना॑। रुश॑ता। स्वङ्ग॒ इति॑ सु॒ऽअङ्गः॑। आ। जा॒तः। विश्वा॑। सद्मा॑नि। अ॒प्राः॒ ॥१३ ॥

Mantra without Swara
अग्रे बृहन्नुषसामूर्ध्वाऽअस्थान्निर्जगन्वान्तमसो ज्योतिषागात् । अग्निर्भानुना रुशता स्वङ्गऽआ जातो विश्वा सद्मान्यप्राः ॥

अग्रे। बृहन्। उषसाम्। ऊर्ध्वः। अस्थात्। निर्जगन्वानिति निःऽजगन्वान्। तमसः। ज्योतिषा। आ। अगात्। अग्निः। भानुना। रुशता। स्वङ्ग इति सुऽअङ्गः। आ। जातः। विश्वा। सद्मानि। अप्राः॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे राजा, जसा सूर्य (अग्रे) सर्वांआधी (स्वड्न:) आपल्या सदर प्रिय अवयवांनी (किरणांनी) (अप्रात:) प्रकट होतो आणि (बृहन्‌) विस्तृत अशा (उषसाम्‌) प्रभात काळाच्या (ऊर्ध्व:) वर आकाशात (अस्थात्‌) स्थिर होतो तसेच (सशता) सुंदर (भानुमा) दीप्तीद्वारे आणि (ज्योतिषा) प्रकाशाद्वारे (तमस:) अंधकाराला (निर्जगन्वान्‌) निरंतर दूर करीत (आगात्‌) सर्व लोकलोकांतरापर्यंत जातो. (प्रकाशाच्या रुपाने तिथे पोहचतो) तसेच (विश्‍वा) सर्व (सद्यामि) स्थूल स्थानांपर्यंतही (अप्रा:) जातो, हे राजा, त्याप्रमाणे आपणही प्रजाजनांमध्ये प्रकाशित व्हा (प्रजेच्या दु:ख, समस्या रुप अंधकाराचा नाश करा.) ॥13॥
Essence
भावार्थ - कोणता वा कशा गुणांनी युक्त पुरुष राज्याचा राजा होण्यास पात्र आहे? जो सूर्याप्रमाणे श्रेष्ठ गुणांमुळे कीर्तिमंत आहे, जो सद्पुरुषांचा उपदेश शिरोधार्य मानून दुर्व्यसनापासून अलग आणि सत्यता न्यायी राजा याप्रमाणे प्रसिद्ध आहे, प्रामाणिक आणि न्यायी या रूपाने ज्याचे यश प्रसृत आहे, जो नीरोग व आकर्षक शरीरधारी आहे, सर्व प्रसिद्ध असून योग्यजनांचा आदर-सत्कार करणारा आहे, तशी रीत जाणतो, आणि जो आपल्या दूत वा हेरांकरवी प्रजेच्या मनातील भावभावना जाणून घेतो आणि न्यायाप्रमाणे सर्वांशी समानतेने व्यवहार करतो. असा सभापती राजा (राष्ट्राध्यक्ष राज्याचा असा सभापती (राष्ट्राध्यक्ष) असायला पाहिजे ॥13॥
Subject
पुढील मंत्रात पुन्हा त्याचविषयी कथन केले आहे -