Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 117

117 Mantra
12/117
Devata- अग्निर्देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अ॒ग्निः प्रि॒येषु॒ धाम॑सु॒ कामो॑ भू॒तस्य॒ भव्य॑स्य। स॒म्राडेको॒ विरा॑जति॥११७॥

अ॒ग्निः। प्रि॒येषु॑। धाम॒स्विति॒ धाम॑ऽसु। कामः॑। भू॒तस्य॑। भव्य॑स्य। स॒म्राडिति॑ स॒म्ऽराट्। एकः॑। वि। रा॒ज॒ति॒ ॥११७ ॥

Mantra without Swara
अग्निः प्रियेषु धामसु कामो भूतस्य भव्यस्य । सम्राडेको वि राजति ॥

अग्निः। प्रियेषु। धामस्विति धामऽसु। कामः। भूतस्य। भव्यस्य। सम्राडिति सम्ऽराट्। एकः। वि। राजति॥११७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सम्राट्) उत्तम आचरण करणारे, कीर्तिमान (एक:) केवळ एक परमेश्‍वराप्रमाणे आत्मनिर्भर (काम:) प्रजेला प्रिय आणि (अग्नि:) अग्नीप्रमाणे तेजस्वी असे जे जे विद्यमान सभापती (राजा वा राष्ट्राध्यक्ष) आहेत (भूतस्य) अथवा जे होऊन गेले आहेत आणि (भव्यस्य) जे होणार आहेत, असे सभापती (राजा वा राष्ट्राध्यक्ष) आपल्या (प्रियेषु) सर्व प्रिय (धामसु) जन्म, स्थान आणि नावाने (विराजाति) प्रकाशित होतात वा कीर्ति मिळवितात. (त्यांच्यामुळे त्यांच्या गावाची, नावाची कीर्ती वाढते), असा मनुष्यच राज्याधिकारी वा राष्ट्राध्यक्ष होण्यास पात्र असतो. ॥117॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे जी माणसे परमात्म्याच्या गुण, कर्म आणि स्वभावाप्रमाणे आपले गुण, कर्म स्वभाव ठेवतात, तेच चक्रवर्ती राज्याचे राजा होण्यास पात्र असतात. ॥117॥
Subject
मनुष्यांनी कसे असावे आणि काय करावे, पुढील मंत्रात हा विषय प्रतिपादित आहे -
Footnote
या अध्यायात स्त्री, पुरुष, राजा, प्रजा, शेती, पठन-पाठन आदी विषयांचे वर्णन आहे. यामुळे या अध्यायातील विषयांची आणि अर्थाची पूर्वीच्या (एकादश) अध्यायाशी संगती आहे, असे जाणावे. ॥^श्रीमद्यानन्दासरस्वती यांनी यजर्वेदाच्या केलेल्या हिंदी वेदभाष्यापैकी बाराव्या अध्यायाचा मराठी अनुवाद समाप्त