Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 111

117 Mantra
12/111
Devata- अग्निर्देवता Rishi- पावकाग्निर्ऋषिः Chhand- स्वराडार्षी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
ऋ॒तावा॑नं महि॒षं वि॒श्वद॑र्शतम॒ग्निꣳ सु॒म्नाय॑ दधिरे पु॒रो जनाः॑। श्रुत्क॑र्णꣳ स॒प्रथ॑स्तमं त्वा गि॒रा दैव्यं॒ मानु॑षा यु॒गा॥१११॥

ऋ॒तावा॑नम्। ऋ॒तवा॑नमित्यृ॒तऽवा॑नम्। म॒हि॒षम्। वि॒श्वद॑र्शत॒मिति॑ वि॒श्वऽद॑र्शतम्। अ॒ग्निम्। सु॒म्नाय॑। द॒धि॒रे॒। पु॒रः। जनाः॑। श्रुत्क॑र्ण॒मिति॒ श्रुत्ऽक॑र्णम्। स॒प्रथ॑स्तम॒मिति॑ स॒प्रथः॑ऽतमम्। त्वा॒। गि॒रा। दैव्य॑म्। मानु॑षा। यु॒गा ॥१११ ॥

Mantra without Swara
ऋतावानम्महिषँविश्वदर्शतमग्निँ सुम्नाय दधिरे पुरो जनाः । श्रुत्कर्णँ सप्रथस्तमन्त्वा गिरा दैव्यम्मानुषा युगा ॥

ऋतावानम्। ऋतवानमित्यृतऽवानम्। महिषम्। विश्वदर्शतमिति विश्वऽदर्शतम्। अग्निम्। सुम्नाय। दधिरे। पुरः। जनाः। श्रुत्कर्णमिति श्रुत्ऽकर्णम्। सप्रथस्तममिति सप्रथःऽतमम्। त्वा। गिरा। दैव्यम्। मानुषा। युगा॥१११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्या, (पूर्वी जसे) (जवा:) विद्या-विज्ञानवान प्रसिद्ध माणसें (होऊन गेली की ज्यांनी (गिरा) आपल्या प्रिय वाणीद्वारे (सुम्नाय) सुखप्राप्तीकरिता (दैव्यम्‌) विद्वानांत कुशल, (श्रुतकर्णम्‌) आणि बहुश्रुत तसेच (विश्‍वदर्शतम्‌) सर्वद्रष्टा आणि (सप्रथस्तमम्‌) विद्येचा भरपूर विस्तार करणाऱ्या लोकांचे अनुकरण केले आणि (ऋतावानम्‌) सत्याचरण करणाऱ्या (महिषम्‌) महान (अग्निम्‌) विद्वानाला धारण केले होते (त्याचे अनुकरण केले होते) (तशा विद्वान गुणवान, द्रष्टा पुरुषाचे तुम्हीही अनुकरण करा) तसेच (युमा) या वर्षात अथवा सतयुगआदी (पुर:) पुर्वीच्या काळात मनुष्यांनी ज्याप्रमाणे विद्वानांचे अनुकरण केले आणि तसा उत्तम काळ पाहिला, तसाच काळ तूही पहा. त्यासाठी विद्वानांचे अनुकरण कर) मी (त्वाम्‌) तुला हे उचित उपदेश सांगत आहे. ॥111॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. माणसांनी पूर्वी जे सत्पुरुष होऊन गेले आहेत, त्यांचेच अनुकरण करावे. त्याहून इतर अधर्मीजनांचे अनुकरण मुळीच करू नये ॥111॥
Subject
मनुष्यांनी कोणाचे अनुकरण करावे, याविषयी पुढील मंत्रात प्रतिपादन केले आहे-