Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 11

117 Mantra
12/11
Devata- अग्निर्देवता Rishi- ध्रुव ऋषिः Chhand- आर्ष्यनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
आ त्वा॑हार्षम॒न्तर॑भूर्ध्रु॒वस्ति॒ष्ठावि॑चाचलिः। विश॑स्त्वा॒ सर्वा॑ वाञ्छन्तु॒ मा त्वद्रा॒ष्ट्रमधि॑भ्रशत्॥११॥

आ। त्वा॒। अ॒हा॒र्ष॒म्। अ॒न्तः। अ॒भूः॒। ध्रु॒वः। ति॒ष्ठ॒। अवि॑चाचलि॒रित्यवि॑ऽचाचलिः। विशः॑। त्वा॒। सर्वाः॑। वा॒ञ्छ॒न्तु॒। मा। त्वत्। रा॒ष्ट्रम्। अधि॑। भ्र॒श॒त् ॥११ ॥

Mantra without Swara
आ त्वाहार्षमन्तरभूर्ध्रुवस्तिष्ठाविचाचलिः । विशस्त्वा सर्वा वाञ्छन्तु मा त्वद्राष्ट्रमधिभ्रशत् ॥

आ। त्वा। अहार्षम्। अन्तः। अभूः। ध्रुवः। तिष्ठ। अविचाचलिरित्यविऽचाचलिः। विशः। त्वा। सर्वाः। वाञ्छन्तु। मा। त्वत्। राष्ट्रम्। अधि। भ्रशत्॥११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - शुभगुणांनी आणि शुभलक्षणांनी संपन्न अशा हे सभापती राजा, (त्वा) आपणाला या राज्याच्या रक्षणासाठी मी (पुरोहित) (अन्त:) या सभेमध्ये (आहार्षम्‌) उत्तमप्रकारे ग्रहण करतो (सर्वांच्यासमक्ष आपणास राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देतो) आपण या सभेमध्ये (अभू:) स्थानापन्न व्हा आणि (अविचाचत्ति:) सर्वथास्थिर अविचल अशा ‘राज्यात (ध्रुव:) न्यायाप्रमाणे राज्यपालन करण्याचा निश्‍चय केलेल्या बुद्धीने (तिष्ठ) राज्य चालवा व या न्यायासनावर स्थिर रहा. (सर्वा:) समस्त (विश:) प्रजाजन (त्वा) आपल्यावर (वाञ्छन्षु) प्रेम करोत (आपण प्रजाप्रिय व्हावे, अशी मी कामना करतो) आणि (त्वत्‌) आपल्या पालन वा आश्रयाखाली असलेले हे (राष्ट्रम्‌) राज्य कधीही (माधिभ्रशत्‌) नष्ट-भ्रष्ट होऊ नये (ही शुभेच्छा) ॥11॥
Essence
भावार्थ - सज्जन प्रजाजनांनी सर्वोत्तम पुरुषालाच (राष्ट्राचा सभापती राजा (राष्ट्राध्यक्ष) म्हणून मान्यता द्यावी आणि त्यास उपदेश करावा की आपण जितेंद्रिय राहून सदैव धार्मिक आणि पुरुषार्थी असावे. ज्यामुळे हे राज्य नष्ट होईल, असे वाईट आचरण आपणांकडून कधीही घडूं नये. असे झाल्यास सर्व प्रजाजन आपणांशी अनुकूल राहून वर्तन करतील. ॥11॥
Subject
यानंतर राजा आणि प्रजा यांच्या कर्तव्यकर्मांविषयी उपदेश केला आहे -