Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 12 / Mantra 106

117 Mantra
12/106
Devata- अग्निर्देवता Rishi- पावकाग्निर्ऋषिः Chhand- निचृत पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
अग्ने॒ तव॒ श्रवो॒ वयो॒ महि॑ भ्राजन्तेऽअ॒र्चयो॑ विभावसो। बृह॑द्भानो॒ शव॑सा॒ वाज॑मु॒क्थ्यं दधा॑सि दा॒शुषे॑ कवे॥१०६॥

अग्ने॑। तव॑। श्रवः॑। वयः॑। महि॑। भ्रा॒ज॒न्ते॒। अ॒र्चयः॑। वि॒भा॒व॒सो॒ इति॑ विभाऽवसो। बृह॑द्भानो॒ इति॒ बृह॑त्ऽभानो। शव॑सा। वाज॑म्। उ॒क्थ्य᳕म्। दधा॑सि। दा॒शुषे॑। क॒वे॒ ॥१०६ ॥

Mantra without Swara
अग्ने तव श्रवो वयो महि भ्राजन्तेऽअर्चयो विभावसो । बृहद्भानो शवसा वाजमुक्थ्यन्दधासि दाशुषे कवे ॥

अग्ने। तव। श्रवः। वयः। महि। भ्राजन्ते। अर्चयः। विभावसो इति विभाऽवसो। बृहद्भानो इति बृहत्ऽभानो। शवसा। वाजम्। उक्थ्यम्। दधासि। दाशुषे। कवे॥१०६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (बृहद्भावो) आपल्या विद्येच्या प्रकाशामुळे अग्नीप्रमाणे चमकणाऱ्या (विभावसो) हे विविध ज्ञान-विज्ञानाच्या कांतीमुळे दीप्तीमान, (कवे) हे अत्यंत बुद्धिमान (अग्ने) अग्निवत्‌ तेजस्वी विद्वान महोदय, आपण (शवसा) संपूर्ण सामर्थ्याने (दाशुषे) ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्याला (उस्थम्‌) सांगण्यास योग्य असे (वाजम्‌) विज्ञान (दघासि) धारण करीत आहात (ते उपयुक्त विज्ञान तुमच्याजवळ आहे आणि ते तुम्ही जिज्ञासू विद्यार्थ्याला देण्यास इच्छुक आहात) यामुळे (तव) तुमच्या अत्यंत प्रशंनीय (महि) अत्यंत पूजनीय (श्रव:) आणि श्रवणीय वचनांमुळे तुमचे (वय:) यौवन आणि (अर्चय:) दीप्ती (कीर्ती) (भ्राजन्ते) विशेषत्वाने प्रकाशित होते (तुमच्या ज्ञानदान करण्याच्या वृत्तीमुळे तुमची कीर्ती द्विगुणित होते) ॥106॥
Essence
भावार्थ - जो माणूस अग्नीप्रमाणे गुणवान आणि आप्त व्यक्तीप्रमाणे कीर्तीने प्रकाशित आहे त्याने आपल्या परोपकारवृत्तीमुळे दुसऱ्यांना विद्या, विनय आणि धर्माचा सदा उपदेश द्यावा ॥106॥
Subject
मनुष्यांनी कसे असावे, याविषयी -